मुंबई (प्रतिनिधी) मागील अनेक वर्षापासून प्रतीक्षेत असलेल्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांना; आर्थिक मागास वर्गातून (EWS) मधून नियुक्त्या मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कारण SEBC चं आरक्षण रद्द झाल्यानंतर MAT नं रोखलेल्या पदांची भरता आता करता येईल. यामुळे 408 उमेदवारांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिलाय. जवळपास 2019 पासून या नियुक्त्या रखडल्या होत्या. महाराष्ट्र लोकसेवा आयोग, वनसेवा, कर सहाय्यक, पीएसआय, कनिष्ठ अभियंता, इतर पदांसाठी या नियुक्त्या करण्यात येणार आहे. यामुळे 3 हजार 485 उमेदवारांना नियुक्त्या मिळणार आहेत.
एसईबीसी आणि ईडब्ल्यूएस आरक्षणाचे प्रकरण हे उच्च न्यायालायात प्रलिंबित होते. या प्रवर्गातून या विद्यार्थ्यांना दहा टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आली होती. परंतु हे प्रकरण न्यायालयामध्ये असल्यामुळे या विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या रखडल्या होत्या. त्यासाठी विद्यार्थ्यांनी उपोषणाचा देखील पवित्रा घेतला होता. पण आता पण आता हायकोर्टाने या नियुक्त्या EWS मधून करण्याचे निर्देश दिले असल्याने, आता या नियुक्त्या कधीपर्यंत होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.
No comments:
Post a Comment