परळी वैजनाथ (प्रतिनिधी) काँग्रेस आयच्या अनुसूचित जाती विभागाची परळी शहर कार्यकारिणी आज रविवार दि.5 फेब्रुवारी रोजी अनुसूचित जाती विभागाचे शहराध्यक्ष दीपक शिरसाठ कार्यकारणी जाहीर केली आहे.
काँग्रेस आयचे बीड जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली अनु जाती विभाग जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कांबळे व.शहराध्यक्ष सय्यद हनिफ उर्फ बहादुरभाई यांच्या मार्गदर्शनाखाली अनु जाती विभागाचे शहराध्यक्ष दीपक शिरसाठ यांनी काँग्रेस आयच्या अनुसूचित जाती विभागाची नुतन कार्यकारिणी आज रविवारी जाहीर करण्यात आली. यावेळी सर्वांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देवून त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देवून सत्कार करण्यात आला.
आज निवडण्यात आलेली नुतन कार्यकारिणी अशी उपाध्यक्षपदी- रमेश कालिदास . सरचिटणीस-नितीन महादेव कसबे , चिटणीस-श्रीकांत रोहिदास वाघमारे , चिटणीस-अविनाश बाबासाहेब कांबळे, संघटक-रवी नरसिंगराव वाघमारे, , कार्यशील सदस्य- कृष्णा वैजनाथ मस्के कार्यशील सदस्य-अजय महादू कसबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहचवून सर्वसामान्य नागरीकांची कामे करावीत असे यावेळी दीपक शिरसाठ यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment