Thursday, February 9, 2023

शिक्षणाचा बाजार ज्युनिअर व सिनिअर केजी चालवणारा शाळा चालक खेळतोय चिमुकल्याच्या जीवाशी...!


चाकण (प्रतिनिधी) : सध्या चाकण शहराच्या आजूबाजूला फ्लॅटमध्ये चिमुकल्याची शाळा भरविण्याचा घाट काही अर्धशिक्षित लोकांनी घातला असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

त्यातच ज्युनिअर व सिनिअर केजी शाळा भरवून जे चिमुकले त्या शाळेत प्रवेश घेतात त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने कोणतीही खबरदारी या अर्धशिक्षित लोकांकडून घेतली जात नाही. चिमुकल्याच्या पालकांना खोटी आश्वासणे देऊन भरमसाठ फी ही वसूल केली जात आहे. त्यातच या शाळांवर प्रशासनाचा अंकुश नसल्याने अव्वाच्या सव्वा फी वसूल करून फी च्या तुलनेत कोणत्याच सुविधा चिमुकल्याना मिळत नसल्याचे समोर आले आहे.

यातील महत्वाची अधोरेखित करणारी बाब म्हणजे या बोगस व अर्धशिक्षित लोकांना तालुक्यातील शिक्षण विभाग सहकार्य करत असल्याचीही खात्रीलायक माहिती मिळाली आहे. तालुक्यात शिक्षणाचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना अधिकारी यांना अशा विषयात लक्ष द्यायला आणि चिमुकल्याच्या जीवाशी खेळणार्‍याना अभय देणार्‍याना पाठीशी घालण्यासाठी वेळच वेळ देत असल्याचे समोर आले आहे. अशा शाळेच्या विरोधात काही सामाजिक संस्था आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचीही चर्चा बाहेर आली आहे.

चाकण शहरातील आंबेठाण रोडला असणार्‍या अशाच एका शाळेच्या संदर्भात तर, अनेक धक्कादायक गोष्टी उजेडात आल्या आहेत. त्यात जो व्यक्ति ही चुकल्याची शाळा चालवत आहे. ती शाळा अक्षरश: एका गजबजलेल्या वसाहतीच्या फ्लॅटमध्ये चालवत असल्याचे दिसून आले आहे. यातील महत्वाची मुद्दा म्हणजे कोणत्याही शासनाच्या नियमांना अधीन न राहता बेसुमार फी वसूली करत असल्याचे समोर आले आहे. नियमांची पायमल्ली करूनही माझ्या मागे या पक्षाचा पुढारी आहे. माझ्यासाठी कोल्हापुरातून फोन आणले जातील अशीही बेबंदशाही हा शाळा चालक करत असल्याचे समोर आले आहे. स्वत: अर्धशिक्षित असल्याने शाळा चालविण्यासाठी नक्की काय करायला हवे याचेच पुरेसे ज्ञान नसल्याने हा व्यक्ति चिमुकल्याच्या जिवावर पोट भरून त्यांच्या जीवाशी खेळत असल्याचे निदर्शनात आले आहे.

या चिमुकल्याची शाळा जिथे भरते, ना तिथे स्वच्छ पाणी पिण्यासाठी मिळते, ना त्यांना सुसज्ज स्वच्छता गृहाची सुविधा आहे. उद्या काही त्या वसाहतीत आपत्कालीन प्रसंग निर्माण झाला तर, ना त्या शाळेत फायर सेफ्टीची सुविधा आहे. त्यामुळे हा महाशय फक्त फी वसूल करून वर्षाकाठी लाखोंच्या घरात मलिदा कमवत असल्याचेही समोर आले आहे. जमा झालेल्या पैशाचे ना ऑडिट करतो, ना शासनाला आयकर परतावा भरतो अशा एक ना अनेक धक्कादायक बाबी या शाळेच्या समोर आल्या आहेत.

यावर खेड पंचायत समिती शिक्षणाधिकारी यांना विचारणा केली असता यावर आमचा कोणताही अंकुश नाही. याला कोणतीही परवानगी लागत नाही अशा आशयाचे उत्तर शिक्षण अधिकारी यांनी दिले. अन शाळेची माहिती घेताच तोच अर्धशिक्षित महाशय थेट शिक्षणाधिकारी यांना भेटायला गेला असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. यावरून नक्कीच अशा चिमुकल्याच्या जीवाशी खेळणार्‍या शाळांना हे अधिकारी अभय तर देत नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जर अशा बोगस ज्युनिअर व सिनिअर केजी शाळांवर कारवाई करण्याचा अधिकार तुम्हाला नसेल तर अशा शाळा सुरू करण्यासाठी तुम्ही अभय पण देऊ नका. आणि जर तुमच्या नियमांनुसार ३ वर्षाच्या पुढील विद्यार्थ्यांच्या बाबतचा विषय तुमच्या अंतेर्गत येत असेल तर तुम्ही त्याआतील वयोगटाच्या शाळांवर कारवाई का करत नाहीत? हाही एक अणुउत्तरीतच प्रश्न म्हणावा लागेल. आता त्या चिमुकल्याच्या जीवाशी खेळणार्‍या ज्युनिअर व सिनिअर केजी शाळेच्या संदर्भात शिक्षण विभागाकडे लेखी तक्रार करणार आहे. त्यावर आता शिक्षण विभाग कारवाई करणार का? की उलट अशा शाळा चालकांना तुम्ही शाळा चालवा आम्ही तुमच्या सोबत आहोत अशीच भूमिका घेणार हेच पहावे लागेल.

No comments:

Post a Comment