Thursday, February 9, 2023

घरकुलाच्या तपासणीसाठी लाचेची मागणी दोघांवर गुन्हा दाखल6 हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले..

सिरसाळा (प्रतिनिधी) घरकूलाची तपासणी करुन तिसऱ्या हप्त्याची रक्कम खात्यावर जमा करण्यासाठी मोबदला म्हणून 6 हजारांची मागणी करण्यात आली. कंत्राटी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकासाठी हीच मागणी केलेली 6 हजार रुपयांची लाच घेताना बीडच्या परळी तालुक्यातील सिरसाळा येथे खाजगी व्यक्तीस रंगेहाथ पकडले आहे.
सचिन रावसाहेब डिघोळे (कंत्राटी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, पंचायत समिती परळी), व बाळू उर्फ राजू लक्ष्मण किरवले वय 28, रा. भीमनगर, सिरसाळा अशी लाचखोरांची नावे आहेत. तक्रारदारास रमाई आवास घरकुल योजने अंतर्गत घरकुल मंजूर झाले होते.
या घरकुलाची तपासणी करून तिसऱ्या हप्त्याची रक्कम खात्यावर जमा करण्यासाठी व जमा केल्याचा मोबदला म्हणून 6 हजार रुपयांची मागणी करून लाचेची रक्कम खाजगी व्यक्ती बाळू किरवले याच्या मार्फत सिरसाळा येथे स्वीकारली. या प्रकरणी सिरसाळा पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment