Sunday, February 5, 2023

मुख्यमंत्र्यांकडून जाहिरातींसाठी सरकारी तिजोरीतून ४२ कोटी ४४ लाख रुपयांची उधळपट्टी.

मुंबई (प्रतिनिधी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ७ महिन्यात जाहिरातींसाठी शासनाच्या तिजोरीतून तब्बल ४२ कोटी ४४ लाख रुपयांची उधळपट्टी केल्याची माहिती उघड झाली आहे, अशी माहिती ही माहिती अधिकारातून उघड झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी शासनाच्या तिजोरीतून दिवसाला १९ लाख ७४ हजार रुपये खर्च केल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे, असा दावा आरटीआय कार्यकर्ते नितीन संजय यादव यांनी केला आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार, आरटीआय कार्यकर्ते नितीन संजय यादव यांनी माहिती अधिकारातून ही माहिती समोर आणली आहे . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज्यात त्यांचे सरकार स्थापन झाल्यापासू फक्त ७ महिन्यात जाहिरातींसाठी शासनाच्या तिजोरीतून तब्बल ४२ कोटी ४४ लाख रुपये खर्च केल्याची धक्कादायक माहिती ही माहिती अधिकारातून प्राप्त झाली आहे.
जाहिरातींचे राज्य शासनाकडून हे देयके उपलब्ध झाले आहेत. यात धक्कादायक माहिती अशी की, खर्चाची सरासरी काढली तरी दिवसाला १९ लाख ७४ हजार रुपये जनतेच्या खिशातला शासकीय पैशांची वारेमाप उधळपट्टी केल्याचे दिसून येत आहे, असे आरटीआय (RTI) कार्यकर्ते नितीन यादव यांनी सांगितले.
सर्वसामन्याच्या खिशातून शासनास जाणाऱ्या या पैशांच्या खर्चावर शासन आतातरी अंकुश लावेल का, जाहिरातबाज सरकार फक्त जाहिरातबाजी न करता प्रसिद्धीचा हव्यास सोडून खरोखरच राज्याच्या विकासासाठी काम करेल का, असा प्रश्न आरटीआय कार्यकर्ते नितीन यादव यांनी केला आहे.

No comments:

Post a Comment