Friday, January 13, 2023

आदर्श सिरसाळा पत्रकार संघाच्या अध्यक्ष पदी अशोक गलांडे‌.

                           
 सिरसाळा  (प्रतिनिधी) दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आदर्श सिरसाळा पत्रकार संघाची नवनिर्वाचित कार्यकारणी जाहिर करण्यात आली आहे. नवनिर्वाचित कार्यकारणीचे अध्यक्ष पदी पत्रकार आशोक गलांडे यांची निवड करण्यात आली आहे. हि निवड आदर्श पत्रकार संघाचे सर्व पत्रकार सदस्य यांच्या सहमतीने पत्रकार मिलिंद चोपडे यांच्या सूचनेवरून पत्रकार रमेश लहाने यांच्या अध्यक्षतेखाली हि निवड करण्यात आली आहे.
    या पुर्वी पत्रकार संघाचे अध्यक्ष मिलिंद चोपडे होते. त्यांचा पदाचा कार्यकाळ संपल्याने नवनिर्वाचित कार्यकारणी नुसार पत्रकार आशोक गलांडे यांची अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. पत्रकार पत्रकार आशोक गलांडे यांनी राजकीय,सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य तसेच सिरसाळ्यासह परिसरातील खेडे गावातील भौतिक प्रश्नावर लिखाण करत आवाज उठवला आहे. अनेक प्रश्न मार्गी देखील लावले. त्यांची हि निवड गुणवत्ते वर आधारित करण्यात आली आहे. पत्रकारीतेत त्यांचे सिरसाळा परिसरात कार्य उल्लेखनीय आहे. म्हणून या वर्षी आदर्श सिरसाळा पत्रकार संघाच्या अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. हि निवड एक वर्षा करिता करण्यात आली आहे. निवड कार्यक्रम दरम्यान पत्रकार रमेश लहाने, पत्रकार मिलिंद चोपडे, पत्रकार बाळासाहेब गरड,पत्रकार अतूल बडे, पत्रकार भागवत जाधव उपस्थित होते.गलांडे यांचे सर्व स्थरातून अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment