*1लाख 30 हजार 470 रुपयाचा मुद्देमाल जप्त;परळीतील संपादक व पत्रकार बांधवांच्या वतीने देण्यात आले होते निवेदन*
परळी वैजनाथ (प्रतिनिधी):- सहाय्यक पोलीस अधीक्षक धीरजकुमार बच्चू यांच्या पथकाने परळी शहरात मोठ्या प्रमाणात चालू असलेल्या अवैध धंद्यावर कारवाईचा बडगा सुरुच ठेवला आहे. परळी शहरात सुरू असलेल्या बिंगो ऑनलाईन मटक्यावर कारवाई करत एक लाख तीस हजार 470 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात सदरील बिंगो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान गेल्या काही महिन्यापूर्वीच परळीचे संपादक व पत्रकाराच्या वतीने ही ऑनलाईन बिंगो मटक्यावर कारवाई करावी या मागणीचे निवेदन परळी शहर व संभाजीनगर पोलीस ठाण्यांना देण्यात आले होते. परंतु स्थानिक पोलिसांनी या निवेदनाकडे दुर्लक्ष केले होते. सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ. बी. धीरजकुमार यांनी केलेल्या कारवाईमुळे बिंगो चालकावर संक्रात आल्याने अवैद्य धंद्यावाल्यांचे धाबे दणाणले आहेत.
याबाबत शहर पोलीस सूत्राकडून प्राप्त माहिती अशी की, सहाय्यक पोलीस अधीक्षक उपविभाग माजलगाव अतिरिक्त पदभार अंबाजोगाई डॉ. बी. धीरजकुमार यांनी अंबाजोगाई उपविभागातील समस्या व तक्रारीची प्रथम प्राधान्याने परळी शहरामध्ये चालणारे अवैद्य धंद्याची माहिती गोपनिय बातमीदार मार्फत हस्तगत करून परळी शहरात सुरू असलेल्या ऑनलाईन बिंगो मटक्यावर कारवाई केली आहे. या प्रकरणी पोलीस हवालदार रवि शंकरराव राठोड यांनी दिलेल्या फिर्यादवरुन आरोपी संतोष रोहिदास हाळने, रमेश मानिक कुरे, गणेश तन्हाजी आव्हाड,अफताफ सत्तार शेख,अब्दुल नसीर सैयद,जाबेर करीम सैयद,शेख सिरातल मोहम्मद नूर मोहम्मद, अपमाश फयाजोद्दीन शेख, सय्यद आफताफ हुसेन,गोविंद सुशील आव्हाड यांच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 17/2023 कलम 4,5 महाराष्ट्र जुगार कायदा अन्वय फिर्याद दिली आहे. वरील 10 आरोपींना ताब्यात घेवुन त्यांचकडून नगदी रक्कम व मोबाईल, कॉम्प्युटर, सी.पी.यु सह एकूण 1लाख 30,470/- रुपायाचा मुद्देमाल जप्त करून पोलीस दलाची प्रतिमा उंचावुन उत्तजनार्थ कामगिरी केली आहे. बिंगो ऑनलाईन मटक्यावर केलेल्या कारवाईमुळे सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ.धीरजकुमार यांच्या पथकाचे कौतुक होत आहे. दरम्यान अशाच प्रकारच्या कारवायाचा धडाका या पथकाने सुरूच ठेवावा असेही जनतेतून बोलले जात आहे.
*माजलगावच्या पथकाने केली कारवाई*
पोस्टे परळी शहर शहरामध्ये चोरून लपुन चालणारा विगो चकरी ऑनलाईन नावाचा जुगारावर पोह राठोड, पोह देशमुख, पोकों चव्हाण, सर्व नेमणूक उपविभागीय पालीस अधिकारी कार्यालय माजलगाव यांनी सिताफिने १० आरोपींना पकडून नगदी रक्कम व मोबाईल, कॉम्प्युटर, सी.पी.यु सह एकुण १,३०,४७०/- रुपायाचा मुद्यमालसह साहित्य मिळून आले.
*अशाच प्रकारच्या कारवाया कराव्यात परळीतील जनतेची मागणी*
गेल्या काही महिन्यापासून परळी शहर व संभाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन पिन कोड नावाचा जुगार सुरू होता या प्रकरणी अनेक वेळा निवेदने देऊनही कसल्याही प्रकारची कारवाई स्थानिक पोलिसांनी केली नव्हती केवळ थातु-मातूर कारवाई करून सोडून दिले जात असे. परंतु सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ.बी.धीरजकुमार यांच्या पथकाने परळी शहरात सुरू असलेल्या ऑनलाईन बिंगो मटक्यावर अजूनही कारवाया कराव्यात अशी मागणी जनतेतून होत आहे.
No comments:
Post a Comment