बीड (प्रतिनिधी) मराठवाडा शिक्षक मतदार संघाचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार कालिदास माने यांच्या प्रचारासाठी बीड येथील अन्विता हॉटेल येथे स्वाभिमानी मुक्टा शिक्षक संघटनेची व्यापक बैठक घेण्यात आली.
औरगांबाद शिक्षक मतदार संघाची निवडणूक येत्या 30 जानेवारी 2023 रोजी होत आहे आपली शिक्षक संघठना म्हणून योग्य उमेदवाराला पाठींबा देने गरजेचे आहे. प्रस्तापित सत्ताधार्यांनी शिक्षकांची आणि शिक्षण क्षेत्राची वाट लावली आहे . प्राध्यापकांच्या आणि शिक्षकांच्या प्रश्नांची जान असलेला आमदार निवडून देणे ही काळाची गरज ओळखून बाळासाहेबआंबेडकर यांनी शिक्षण क्षेत्रात मोठ काम असलेले कार्यकर्ते नेते शिक्षक असलेले कालिदास माने यांना उमेदवारी जाहीर केली.त्यांच्या विचांराशी सहमती दर्शवत संघटनेच्या प्रमुख पदाधीकारी यांच्याशी चर्चा करून कालिदास मने याना पाठिंबा दिला आहे
त्याना पसंती क्रमांक एक चे मतदान देऊन विजई करावे असे आवाहन स्वाभिमानी मुक्टासंघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.शंकर अंभोरे यांनी केले.
या बैठकीस उमेदवार कालीदास माने वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील डॉ. किशोर साळवे, विलास पांडे, डॉ कालिदास सूर्यवंशी, डॉ. भिष्मा रासकर, डॉ. धम्मपाल घुंबरे, प्रा. विक्रम धनवे, डॉ.राज कोरडे, डॉ.सुनील त्रीभवन, डॉ. बालाजी साबळे, डॉ. सावते संजय,प्रा.बालाजी जगतकर, जिल्हाध्यक्ष उद्धव खाडे, ज्ञानेश्वर कवठेकर,युवा जिल्हाध्यक्ष अनुरथ वीर,महिला जिल्हाध्यक्ष ॲड अनिता चक्रे, शहर अध्यक्ष लखन जोगदंड, जिल्हा,तालुका,शहर, महिल,युवा सह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व शिक्षक मतदार आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment