बंडु कठाळु गायकवाड (वय 45 वर्षे, रा. सौंदाना ता. बीड) हा ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत दारू बनवून तो इतरत्र विक्री करत होता. त्याच्यावर सहा गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्याला 26 ऑगस्ट 2022 रोजी प्रतिबंधात्मक कारवाई करून समज दिली होती. मात्र तो कारवायांना झुगारून पुन्हा गुन्हेगारी करू लागला. त्यामुळे त्याच्यावर एमपीडीए अंतर्गत बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेप्रमुख संतोष साबळे यांनी प्रस्ताव पाठविला होता. तो प्रस्ताव पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर आणि जिल्हाधिकारी यांनी मंजूर करताच दारू माफिया गायकवाड याला 17 जानेवारी रोजी ताब्यात घेऊन त्याची हर्सूल कारागृहात रवानगी केली. ही कारवाई पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर अधिक्षक सचीन पांडकर, डीवायएसपी संतोष वाळके, पो.नि. सतीश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. संतोष साबळे, सहायक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे, पो.नाईक सुनील अलगट, अंकुश वरपे, जायभाये यांच्यासह आदींनी केली.
No comments:
Post a Comment