Monday, January 23, 2023

मनसेचे पुणे जिल्हाध्यक्ष समीर थिगळेवर गोळीबार, दैव बलवत्तर थिगळेचा जीव वाचला....!


खेड (राजगुरूनगर) : मनसेचे पुणे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना २१ जानेवारी रात्री घडली. या घटनेने संपूर्ण खेड तालुक्यात खळबळ उडाली आहे.

पुणे जिल्हात कायदा व सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न उपस्थित करणारी घटना समोर आली आहे. पुणे शहरात एकीकडे कोयता गँगने हैदोस माजवला असताना खेड तालुक्यातील मनसेचे पुणे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. समीर थिगळे यांचे दैव बलवत्तर म्ह्णून ते या घटनेतून थोडक्यात बचावले.

पुणे मनसे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे शनिवारी (२१ जानेवारी) रात्री राजगुरूनगरच्या सातकरस्थळ येथील त्यांच्या राहत्या घरासमोर हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

मी खेडातला भाई आहे. एकाला घालवलाय. तुलाही माज आलाय. संपवतोच तुला" असं म्हणत पिस्तूल रोखून एकाने पैशाची मागणी करत समीर थिगळे यांना धमकी दिली. मोक्का आणि खुनाच्या गुन्ह्यात जमीनावर असलेल्या आरोपिंकडून खंडणीची मागणी करत थिगळे यांच्यावर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. आरोपीने समीर थिगळे यांच्यावर पिस्तूल रोखत फायरिंग केली. मात्र, नशीब चांगले म्ह्णून छातीवर फायरिंग वेळी पिस्तूल न चालण्याने अनर्थ टळला. त्यानंतर दुसरा राउंड हवेत फायर झाला.

या प्रकरणी राजगुरूनगर पोलीस ठाण्यात पोलिसांनी मिलिंद जगदाळे आणि मयूर जगदाळे यांच्या विरोधात प्राणघातक हल्ला करणे, शस्त्राचा वापर करून पैसे मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी घटनेनंतर फरार झाले आहेत. पुढील तपास राजगुरूनगर पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत.

No comments:

Post a Comment