Monday, January 23, 2023

धक्कादायक.! प्राचार्यांकडून अल्पवयीन विद्यार्थिनीला धमक्या आणि अत्याचार.! पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल...


मुंबई (प्रतिनिधी) राज्यात महिला आणि मुलींवर अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून, नवजात शिशूसह वयोवृद्ध महिला देखील यात सुरक्षित नसल्याचे चित्र मागील काही घटनांवरून दिसून येत आहे. तर आई-वडिलांनंतर सर्वाधिक पवित्र नातं आणि आयुष्याचे गुरु म्हणून ज्यांना आपण संबोधित करतो; ते गुरु/शिष्य नातही आता पवित्र राहिलं नसून, या नात्याला किंबहून या पेशाला देखील काळिमा फासणार्‍या घटना घडू लागल्या आहेत.

अशीच एक घटना देशातील सुरक्षित शहर अशी ओळख असणार्‍या भागातून समोर आली असून, या घटनेने राज्यसह शिक्षकी पेशाला काळिमा फासली आहे. मुंबईत एका नराधम प्राचार्यांकडून, अल्पवयीन विद्यार्थिनीला केबिनमध्ये बोलवून बलात्कार केल्याची घटना उघडकील आली आहे. सदर घटना मुंबईतील नागपाडा भागात उघडकीस आलीय. या प्रकरणी पोलिसांनी IPC आणि पॉक्सो कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून, अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा प्राचार्य फरार झाला आहे. पोलीस त्याचा तपास करत आहेत.

No comments:

Post a Comment