परळी वैजनाथ (प्रतिनिधी) नाथ शिक्षण संस्था संचलित यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय येथे प्राचार्य प्रा.अतुल दुबे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
26जानेवारी 2023 भारत देशाच्या 74 व्या प्रजासत्ताक (गणराज्य) दिन देशभर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असून याच अनुषंगाने परळी वैजनाथ येथील नाथ शिक्षण संस्था संचलित यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय येथे सकाळी 8:10 वाजता राष्ट्रपती महात्मा गांधी व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.अतुल दुबे यांच्या हस्ते करून प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या वेळी महाविद्यालयाचे प्रा. ए.ए. मुंडे मॅडम,प्रा.एस.आर.कापसे, प्रा.यु.एन.फड,प्रा. ए.डी. शेख, प्रा. पी.पी. परळीकर,ए.डी. आघाव, व्ही.एन.शिंदे, जी. व्ही. कांबळे,यु.बी.जगताप , एम.पी.सातपुते, एन. व्ही. दळवी यांच्या सह प्राध्यापक कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment