Wednesday, January 25, 2023

कामगार कल्याण मंडळाच्या वतीने राज्यस्तरीय.कामगार पुरुष व महिला भजन स्पर्धेचे आयोजन.

*कल्याण आयुक्त रविराज इळवे यांचे भजन स्पर्धेला उपस्थित राहण्याचे आवाहन . 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी): महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने २७ वी  राज्यस्तरीय कामगार पुरुष आणी १७ वी  महिला भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
 महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त  दरवर्षी  भजन स्पर्धेचे आयोजन केले जाते.  या वर्षीच्या भजन स्पर्धा आयोजनाचा बहुमान मराठवाडा विभागाला मिळाला आहे. 
या स्पर्धा औरंगाबाद येथील तापडिया नाट्यमंदिर येथे २९ व ३० जानेवारी रोजी होणार असून राज्यभरातून ३८ भजनी संघ  स्पर्धेत सहभागी होणार आहे.
 स्पर्धेचे उद्घाटन रविवारी स. १० वाजता लोकमत मिडीया प्रा. लि.चे मानव संसाधन विभागाचे उपाध्यक्ष बालाजी मुळे, कामगार उपायुक्त चंद्रकांत राऊत, दै. सकाळचे निवासी संपादक दयानंद माने यांच्या  उपस्थितीत होणार आहे. तर सोमवारी सायं. ७ वाजता या स्पर्धेचे पारितोषिक वितरण मराठवाडा विकास मंडळाचे अपर आयुक्त विजयकुमार फड, दै. लोकमतचे संपादक चक्रधर दळवी यांच्या शुभहस्ते होणार आहे.  यावेळी कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज इळवे यांची उपस्थिती राहणार आहे.
   स्पर्धेत  नाशिक, नागपूर, जळगाव, चंद्रपूर, अकोला, अमरावती, ठाणे, नायगाव, अंधेरी,  चिपळूण, पुणे, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, नांदेड, लातूर या गटातील ३८ महिला व पुरुष भजनी संघाचे सादरीकरण होणार आहे. कोरोना संसर्गाच्या दोन वर्षाच्या कालखंडानंतर भजन स्पर्धा होत आहे.
भजन स्पर्धेचा लाभ घ्यावा असे आवाहन कल्याण आयुक्त रविराज इळवे, प्र. सहाय्यक कल्याण आयुक्त मनोज पाटील यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment