परळी वैजनाथ ( प्रतिनिधी) परळी शहरातील संभाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंदे सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर संभाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश चाटे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर पोलिसांनी शहरातील गणेश पार भागात कारवाई केली असून याप्रकरणी संभाजीनगर पोलीस ठाण्यात आठ आरोपींनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संभाजीनगर पोलिसांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की संभाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गणेश पार येथील संतोष नावंदर यांच्या घराच्या पत्र्याच्या शेडमध्ये विनापरवाना बेकायदेशीररित्या कल्याण नावाचा मटका जुगार खेळत व खेळवीत असल्याची माहिती संभाजीनगर पोलिसांना मिळाली असता पोलीस निरीक्षक सुरेश चाटे यांच्या मार्गदर्शनाखाली रुपेश शिंदे यांच्या पथकाने गणेशपार या भागात छापेमारी करत पाच जणांना ताब्यात घेत त्यांचे विरोधात संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 13/ 2023 कलम 4,5,12 महाराष्ट्र जुगार कायदा नुसार गुन्हा दाखल केला असून संभाजीनगर पोलिसांनी केलेल्या या कारवाईत एकूण 35 हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गीते हे करीत आहेत.
No comments:
Post a Comment