Monday, January 23, 2023

उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुखपदाची मुदत आज संपणार; निवडणूक आयोगाच्या भूमिकेकडे लक्ष...

मुंबई  (प्रतिनिधी)    - उद्धव ठाकरे यांची २०१८ मध्ये पक्षप्रमुखपदी निवड झाली. मुदत आज सोमवारी संपत आहे. महाविकास आघाडीत नाराजी असल्यामुळे  एकनाथ शिंदे यांनी बंड करत शिवसेनेला खिंडार पाडले. आता शिवसेना कोणाची, हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगापुढे सुरू आहे. हा निर्णयावर आयोग ३० जानेवारीला निकाल देणार आहे.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षप्रमुखपदाची मुदत संपत असल्याने शिवसेना ठाकरे गट पुढील रणनीती काय ठरवणार याकडे देखील महत्वाचे ठरणार आहे. याबाबत खासदार अनिल देसाई म्हणाले, की ठाकरे यांच्या पक्षप्रमुखपदासाठी मुदतवाढ द्यावी आणि पक्षांतर्गत निवडणुका घेऊ द्याव्यात, अशी मागणी आम्ही आयोगाकडे केली आहे. त्यावर त्यांनी निर्णय दिलेला नाही.

आज सोमवारी मुदत संपत असल्याची बाब तांत्रिक आहे. आयोगाच्या निर्णयानंतर पुढील दिशा ठरविली जाईल.

No comments:

Post a Comment