Friday, January 13, 2023

एस.टी बसच्या धडकेत मोटार सायकल स्वार ठार; लोखंडी रोडवर सकाळी घडली घटना.

अंबाजोगाई (प्रतिनिधी) भरधाव वेगात निघालेल्या शिवशाही एसटी बसने मोटारसायकलला जोराची धडक दिली. या अपघातात मोटारसायकल स्वार जागीच ठार झाल्याची घटना आज सकाळी 11 वाजता कृषी विज्ञान केंद्राजवळील लोखंडी रोडवर घडली.
औरंगाबादहून लातूरकडे निघालेल्या एसटी बसने मोटारसायकल (क्र. एम.एच. 44 ए. 9527) ला जोराची धडक दिली. या अपघातात धम्मपाल साखरे (वय 32, रा. लोखंडी सावरगाव) हे जागीच ठार झाले. घटना घडल्यानंतर मृतदेह काही वेळ घटनास्थळीच होता. घटनेची माहिती कळताच पोलीस दाखल झाले होते. या प्रकरणी बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.


No comments:

Post a Comment