Tuesday, December 13, 2022

कॉलेजसाठी निघाली अन्‌ काही वेळातच आलेल्‍या फोनने कुटुंब हादरले.

धुळे (प्रतिनिधी) कॉलेजला जाते, असे सांगून दुचाकी घेऊन घराबाहेर पडलेल्या तरुणीने नकाणे तलावात आत्महत्या केल्याचा प्रकार सोमवारी (ता.१२) सकाळी उघडकीस आला. याप्रकरणी धुळे पोलिसात  ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली. 
चेतना पुरुषोत्तम पाटील (वय २२, रा. प्लॉट क्रमांक-१८, यशोधन कॉलनी, वलवाडी, देवपूर धुळे) असे मृत तरुणीचे नाव आहे. चेतना ही सोमवारी (१२ डिसेंबर) सकाळी पावणेसात ते सातच्या सुमारास कॉलेजला जाते असे सांगून दुचाकीने घरून निघाली. त्यानंतर सकाळी नऊला तिचे आजोबा काशिनाथ खंडू काकुळदे यांना माहिती मिळाली, की तुमची दुचाकी नकाणे तलावाजवळ उभी आहे. तलावात एका मुलीचा मृतदेह तरंगत आहे.

No comments:

Post a Comment