बीड (प्रतिनिधी )प्रकाश आंबेडकर नगर येथे दुसऱ्या टप्प्यातील वही पेन वाटप 6 डिसेंबर 2022 रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाणदिनी वही पेन दान अभियानात दानदात्यांकडून जमा झालेल्या वही पेन चे दुसऱ्या टप्प्यातील वाटप, प्रकाश आंबेडकर नगर परिसरातील विद्यार्थ्यांना कार्यक्रमा चे प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ पत्रकार बालाजी जगतकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये 40 विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महामानव अभिवादन ग्रुपचे अध्यक्ष जीएम भोले हे होते.
सर्वप्रथम महामानवांना प्रमुख पाहुणे व अध्यक्ष, उपस्थित पालकांच्या हस्ते पुष्प व पुष्प माला अर्पण करून अभिवादन करण्यात आले, सामुदायिक त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार बालाजी जगतकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना म्हणाले ते म्हणाले की आपणास देण्यात आलेला पेन वही हे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी मिळालेल्या दानातून देण्यात आले आहेत. डॉ.बाबासाहेबांनी वही पेन म्हणजे विद्वत्ता प्रचुर जगतमान्य लिखाण केले व जीवनभर विद्यार्थी म्हणून जगलेल्या जोरावर देशा चे महान संविधान म्हणजेच राज्य घटना लिहून हे सिद्ध केले. त्यांची शिक्षणा बद्दल व ज्ञान मिळवण्याची प्रचंड जिज्ञासा वृत्तीची सतत आठवण ठेवावी. "शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो प्राशन करेल तो गुरगुल्या शिवाय राहणार नाही" ह्या महान विचाराचा कधीही विसर पडू देऊ नये असे मुलांना प्रश्न उत्तर च्या स्वरूपात समजून सांगितले.यावेळी समता सैनिक दलाचे मेजर व जिल्हाध्यक्ष कॅप्टन राजाभाऊ आठवले यांनी विद्यार्थ्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या वंशावळीची सखोल अशी माहिती दिली त्या सर्वांच्या कार्याची व त्यागाची सतत आठवण ठेवली पाहिजे. योगायोगाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू समता सैनिक दलाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांच्या जन्मदिनी सर्वांनी मांगल्याची भावना व्यक्त केली.अध्यक्षीय समारोप करताना जी.एम.भोले यांनी विद्यार्थ्यांना शिस्त, स्वच्छता, गुरुजनांचा आदर आई-वडिलांचे कष्ट याबद्दल जाणीव करून दिली. मोठे झाल्यावर समाजाचे ऋण कसे फेडता येईल अशा थोर महापुरुषांच्या जीवनाचे उदाहरण देऊन मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डी. जी. वानखेडे यांनी केले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी.एम. राऊत यांनी केले. आभार विशाखा वाघमारे यांनी मानले. या कार्यक्रमास काशिनाथ वाघमारे, बी.जी दळवी, धम्मपाल विद्यागर डॉ.जगदीश वाघमारे,पंचफुला जावळे,किसनाबाई जाधव,वंदना वाघमारे, सम्राट वाघमारे, बाबासाहेब वडमारे,रेणुका वाघमारे,अश्विनी डोंगरे,स्नेहा विद्यागर व परिसरातील पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप सरणातयेने व विद्यार्थ्यांना फळ वाटपाने करण्यात आला.
No comments:
Post a Comment