चाकण (प्रतिनिधी) असं म्हणतात ना, अनैतिक प्रेमाचा शेवट वाईट होतो तशीच काहीशी एका चित्रपटाच्या कथेला लाजवेल अशा पद्धतीने महाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीत निर्घृरून खून झाल्याची घटना घडली आहे.
चाकण परिसरातील निघोजे गावात धनंजय नवनाथ बनसोडे (वय -४३ वर्षे ) यांचा फरसाण बनविण्याचा व्यवसाय असून त्यांची ग्लोबल फूड्स नावाची कंपनी आहे. धनंजय बनसोडे हे १५ डिसेंबर २०२२ ला रात्री १० वाजता ते १६ डिसेंबर २०२२ रोजी ९ वाजताच्या दरम्यान घरातून कुठेतरी निघून गेल्याची तक्रारी वरून प्रथम मानव मिसिंग नुसार गुन्हा नंबर ३६६/२०२२ प्रमाणे तक्रार दाखल करण्यात आली.
त्यानंतर म्हाळुंगे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि बेपत्ता व्यक्तीबद्दल माहिती घेण्यास सुरुवात केली असता. बेपत्ता व्यक्ती धनंजय बनसोडे यांचे नागपूर येथील एका महिलेशी ३ वर्षांपूर्वी फेसबुकच्या माध्यमातून होऊन त्यांच्या मधुर संबंधातून प्रेमसंबंध निर्माण झाले होते. त्यांच्या या मधुर प्रेमसंबंधाची माहिती धनंजय बनसोडे यांच्या घरात पत्नी, मुले सुजित बनसोडे (वय -२१वर्षे ) व अभिजित बनसोडे (वय -१८ वर्षे )यांना समजताच घरात वारंवार वाद होऊ लागले. सदरचे वडिलांचे प्रेम संबंध मुलांना मान्य नव्हते. त्यामुळे मुले आपल्या जीवावर उठले आहेत ते आपला घातपात करून जीवे ठार मारतील अशी शंका खून झालेले धनंजय बनसोडे यांना आली होती. तशी शंका मयत धनंजय बनसोडे यांनी त्यांची प्रेमिकेस बोलुनही दाखवली होती. त्यानुसारच म्हाळुंगे पोलिसांनी शीताफिने तपासाची चक्रे फिरून अतिशय गंभीर व क्रूर स्वरूपाची घटना असतानाही पोलिशी कौशल्य दाखवून अतिशय कमी वेळात गुन्हा उघडकीस आणला.
महाळुंगे पोलिसांनी धनंजय बनसोडे यांचा खून करणारे त्यांची मुले सुजित बनसोडे व अभिजित बनसोडे यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सखोल तपास केला असता त्यांनी वडिलांचे नागपूर येथील महिलेशी असलेले प्रेम संबंध मान्य नसल्यामुळे वडिलांचा असा क्रूर पणे खून केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर १९४९/२०२२ भारतीय दंड अधिनियम कलम ३०२,३४ अन्वयेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार पुढील तपास महाळुंगे पोलीस करत आहेत.
यावरून एकच बाहेरील प्रेमापाई स्वतःच्या पोटच्या मुलांनीच स्वतःच्या रक्ताच्या बापाचा घात केला, पण प्रेम प्रेम असते त्यात स्वार्थ नसतो हा एक धागा घेऊन निस्वार्थी प्रेमिकेने धनंजय बनसोडे यांच्यावरील प्रेम निभावून स्वतः पुढे येऊन या गंभीर गुन्हात पोलिसांना सहकार्य करून गुन्हा दाखल केला आहे.
सदर गुन्हा उलगडण्यासाठी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अप्पर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उपायुक्त परिमंडळ -१ चे विवेक पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त चाकण विभाग प्रेरणा कट्टे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली महाळुंगे पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे )किशोर पाटील, पोलीस उपनिरीक्षक विलास गोसावी, पोलीस अंमलदार राजू कोणकेरी, विनोद जाधव, युवराज बिराजदार, अमोल बोराटे, संतोष होळकर, विठ्ठल वडेकर, संतोष काळे, किशोर सांगळे, शिवाजी लोखंडे, अमोल माटे, गणेश गायकवाड, राजेंद्र खेडकर, भाग्यश्री जमदाडे यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) किशोर पाटील हे करत आहेत.
No comments:
Post a Comment