Wednesday, December 14, 2022

ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदान करताना छुप्या कॅमेऱ्यामध्ये चित्रण केल्यास होणार कारवाई !


केज (प्रतिनिधी) ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत अनेक उमेदवार हे जमाव जमवून मतदान यंत्राची पूजा-अर्चा करून निवडणूक आचार संहितेचा भंग करीत असल्याने केज तालुक्यातील हा बेकायदेशीर प्रकार बंद करण्यासाठी तहसीलदार यांना निवेदन दिले आहे.

या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील ६६ ग्रामपंचायतीचे मतदान असून त्या पैकी दोन ग्रामपंचायती यांनी निवड ही अविरोध झालेली आहे. उर्वरित ६४ ग्रामपंचायतीसाठी दि. १८ डिसेंबर रोजी मतदान होत आहे. दरम्यान ग्रामपंचायतीच्या मतदाना दिवशी मतदान सुरु होण्या पूर्वी विविध पार्ट्यांचे उमेदवार आणि त्यांचे समर्थक एकत्र येऊन मतदान यंत्राची गुलाल, हार घालून नारळ फोडून पूजा करतात. तसेच मतपेटी व यंत्र पुजनाच्या निमित्ताने २०-२५ जण एकत्र येत मतदान कक्षात प्रवेश करतात. दिवसभर विनापरवाना मतदान केंद्र आणि परिसरात ये -जा करतात. काही मतदान प्रतिनिधी देखील दारु पिऊन दिवसभर मतदान केंद्रात आलेल्या मतदारास दमदाटी करुन त्याचे मतदान स्वत: करतात. त्यांना हवे असलेल्या उमेदवारांना मतदान करण्यास भाग पाडतात. तसेच काही लोक गावातील मतदारावर मतदान कक्षात व बाहेर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे मुक्त वातावरणात निपक्ष पद्दतीने मतदान होत नाही.
त्यामुळे मतदान यंत्र व मतदान पेटी यांची पूजा करण्यात येऊ नये. अशी मागणी केज तालुक्यातील सातेफळ येथील सुमारे पावणे दोनशे मतदारांनी एका निवेदनाद्वारे तहसीलदार केज यांच्याकडे केली आहे. याच्या प्रती जिल्हाधिकाती, अतिरिक्त जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, सहाय्य पोलीस अधीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक याना दिल्या आहेत.

छुप्या कॅमेऱ्याद्वारे आणि मोबाईल द्वारे होऊ शकते मतदानाचे चित्रीकरण होण्याची भीती :- मतदाना दरम्यान काहीजण छुवया कॅमेऱ्याने किंवा मोबाईलने मतदानाचे चित्रीकरण करून आचार संहितेचा भंग करणे आणि मतदारांवर दबाव टाकण्याची देखील भिती व्यक्त होत आहे.


असा गैरप्रकार आढळून आल्यास नियमानुसार कारवाई होणार — तहसीलदार मेंडके
मतदान केंद्रावर असा मतदान पेटी, मतदान यंत्र किंवा व्हीडिओ चित्रिकरण असे प्रकार आढळून आल्यास मतदान केंद्राध्यक्ष आणि कर्तव्यावरील पोलीस अधिकारी यांना कठोर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत.





No comments:

Post a Comment