Sunday, December 11, 2022

रामभाऊ म्हाळगी विद्यालयात बोगस शिक्षक भरतीला संस्थेकडूनच शिक्षकांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न.

*कायदेशीर संस्थेतील मंडळाला नक्की संस्थेत काय सुरु आहे हेच कळेना...!


खेड (प्रतिनिधी): रामभाऊ म्हाळगी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात तब्बल ५ ते ६ शिक्षकांची बोगस भरती झाल्याचे समोर आले होते. यात विशेष बाब म्हणजे मे २०१२ नंतर शासनाच्याकडून शिक्षक भरतीला स्थगिती देण्यात आली होती. त्यानंतर हे बहाद्दर शिक्षक बोगस पद्धतीने भरती झाल्याचे कागदपत्रातून निष्पन्न झाले आहे.

यातील काही शिक्षकांची बोगस जाहिरात, काहींचा बोगस प्रवर्ग, काहींची नक्की कोणत्या प्रवर्गातून भरती झाली याचे स्पष्ट काही दिसून येत नसल्याचे कागदपत्रातून दिसते आहे. यात विशेष बाब म्हणजे या शिक्षक भरतीच्या वेळी संस्थेत अंतर्गत वाद-विवाद सुरु असल्याने नक्की संस्थेला भरती प्रक्रिया करण्याचा अधिकारच नसल्याचे दिसून येते आहे. यात मोठ्या आर्थिक तडजोडी करून या शिक्षकांची भरती झाल्याचे दिसून येत आहे. त्यात एक पश्चिम पट्ट्यातील अर्धा शहाणा शिक्षक याच्या त्याच्या जवळ चुकीचे करूनही आमची भरती बरोबर असल्याचे भासवत आहे. तर एक राजगुरूनगर शहराच्या जवळ राहून आमचे एकदम ओके आहे असे सांगत फिरत आहे. पण या कमी डोके असलेल्या दोघानाही कोर्टाचा आदेश काय आहे हाच कळला नसल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे.
संस्थेने वरील ४ शिक्षकांना कमी करण्याचे ठरवले होते. त्या निर्णयाच्या विरोधात वरील चार शिक्षक उच्च न्यायालयात गेले होते. त्यावर न्यायालयाने त्यांना जैसे थे, ठेवा असा शिक्षण संस्थेला आदेश दिला होता. तो न शिक्षणाधिकारी यांना दिला. हे अनफड शिक्षक आम्हाला न्यायालयाने आदेश दिला अशी बतावणी करून दिवस काढत आहेत. जेव्हा न्यायालयाने शिक्षणाधिकारी किंवा राज्य सरकारला आदेश दिला असता त्यानंतर त्यांचे काम हे नियमाना धरून झाले असते. न्यायालयाचा आदेश जर यांच्या पदाला मान्यता द्यावी यासाठी झाला असता तर, तो आदेश सर्व राज्याला लागू झाला असता. पण या अनफड शिक्षकांना न्यायालयाचा आदेश काय आहे? हेच समजले नाही आणि गावभर आमची भरती कायदेशीर झाली असल्याची दवंडी पिटवत आहेत.

या भरतीत दुसरी बाजू म्हणजे वाद असलेल्या दोनही संचालक मंडळाने या शिक्षकांच्या पदाला मान्यता मिळविण्यासाठी बोगस ठराव दिल्याचे दिसून आले आहे. त्या ठरावांची कोणत्याही संस्थेच्या दप्तरी नोंद नसल्याचे समोर आले आहे. त्यात या बहाद्दर आणि मुजोर शिक्षकांनी चुकीच्या जाहिराती व स्वतः शिक्षक पात्रता परीक्षा, भरती प्रवर्ग एक आणि मान्यता घेण्यासाठी एक प्रवर्ग दाखवून उघडपणे शासनाची मोठी आर्थिक फसवणूक केल्याचे दिसून आले आहे. या भरतीत संस्था, शिक्षक, माध्यमिक शिक्षण विभागाचे अधिकारी यांच्यात मोठया आर्थिक तडजोडी झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे. या सर्व बोगस भरती प्रक्रियेत संस्थेचे दोनही संचालक मंडळ दोषी असल्याचे समोर आले आहे. तर हे बोगस मगरूर शिक्षक आमचे नावे आल्यावर आम्ही कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जाऊ असा धमकी वजा इशारा देत असल्याची चर्चा विद्यालयात होत आहे. पण चूक करून कोणत्या तोंडाने हे असे बोलतात हेच कळायला मार्ग नाही.
या सर्व भरती प्रक्रियेत नव्यानेच अस्थित्वात आलेल्या संचालक मंडळाला नक्की संस्थेत काय सुरू आहे हेच कळायला मार्ग नाही. नवनियुक्त अध्यक्ष तर स्वतःच्या गावातील ग्रामपंचायत निवडणुकीत दंग असल्याचे दिसून येत आहे. म्हणजे त्यांना विद्यालयातील जटील प्रश्नाचे काहीही सोईर सुतक नसल्याचे यावरून समोर येते. त्या उलट ज्यांच्या हातून ही संस्था गेली त्यांनी फक्त कोणत्या तरी हेतूने धर्मादाय, शिक्षण विभाग याकडे पत्रव्यवहार करण्याचा कारभार करत असल्याची माहिती मिळाली आहे. यावरून दोनही संचालक मंडळाला विद्यालयापेक्षा संस्थेचा राजकीय फायदा कसा उचलता येईल एवढेच डोक्यात असल्याचे प्रकर्षाने दिसते आहे.
शिक्षकांची बोगस भरती, संस्थेतील अंतर्गत वाद यामुळे विद्यालयातील मुलांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे पालक बोलून दाखवत आहेत. ज्या विद्यालयाची पट संस्था हजाराच्या घरात होती ती आता पाचशे पर्यंत येऊन पोहचली आहे. हे संस्थेच्या भविष्यासाठी खेद जनक असल्याचे पालक बोलून दाखवत आहेत. बोगस शिक्षकांच्या पैकी एक पश्चिम पट्ट्यातील अन एक राजगुरूनगर शहराच्या जवळ राहणाऱ्या शिक्षकांना स्वतः बोगस असूनही बढाया मारण्यात रस असल्याचे समोर आले आहे. त्यातील पश्चिम पट्ट्यातील कमी डोक्याच्या शिक्षकाचे इतरही कारनामे  या संस्थेतील सर्व शिक्षकांची सविस्तर बोगस पद्धतीने भरती कशी झाली याची पोलखोल लवकरच करण्यात येणार आहे. त्यामुळे अर्धवट बोगस भरती होऊनही साव सारखे फिरणारे शिक्षक यांची पळता भुई थोडी झाल्याशिवाय राहणार नाही.

No comments:

Post a Comment