राज्यात मागील काही वर्षांपासून वादाचा विषय असलेला औरंगाबाद नामांतराचा मुद्दा.! काही केल्या संपण्याचे नाव घेत नाही. तर सरकरकडूनही ठोस निर्णय हित नसल्याने, मधीच औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा चर्चेत येतो. तर मध्यंतरी सरकारने (मंत्रीमंडळाने) औरंगाबाद ऐवजी छत्रपती संभाजीनगर असा नामउल्लेख करण्याचा निर्णय घेतला असता; राज्यात या निर्णयाचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले होते. तर अनेक ठिकाणी औरंगाबाद ऐवजी छत्रपती संभाजीनगर असा उल्लेख करण्यास सुरुवातही झाली.
काही दिवसांपूर्वीच राज्य परिवहन महामंडळाने एसटी बसवर औरंगाबाद ऐवजी छत्रपती संभाजीनगर असा उल्लेख केला होता. त्यानंतर नागरिकांमध्ये काहीसा भ्रम निर्माण झाला असता; माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी औरंगाबाद जिल्हा प्रशासनाला नामांतराचा अधिकृत खुलासा करण्याबाबत पत्रव्यवहार केला आहे. त्यावर आज औरंगाबाद जिल्हा प्रशासनानेच अधिकृत खुलासा केला असून, पत्राला उत्तर देतांना 'औरंगाबाद नामांतराबाबतचे महसूल प्रशासनाला कोणतेही अधिकृत शासन परिपत्रक, शासन निर्णय किंवा राजपत्र अद्यापपर्यंत प्राप्त झालेले नाही,' असा खुलास जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आला आहे.
माजी हर्षवर्धन जाधव यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवलेल्या पत्रात म्हंटले होते की, "औरंगाबाद शहराचे नाव हे संभाजीनगर किंवा छत्रपती संभाजीनगर असे नामकरण करण्यात आले आहे. अशा पध्दतीने घोषित करीत आहेत. त्याचबरोबर त्यांचे सर्व कार्यकर्ते सबंध जिल्हयामध्ये छत्रपती संभाजीनगर आम्ही केलं अशा पध्दतीचे बोर्ड लावत आहेत. तथापि सर्व सामान्य माणसाला याच्यामध्ये द्विधा होत आहे. कारण औरंगाबाद महानगरपालिकेच्या बोर्डवर अजूनही औरंगाबाद आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बोर्डवरही औरंगाबाद नाव आहे. त्यामुळे याच्यामध्ये विसंगती असल्यामुळे नेमके खरे शासनाचे नांव या जिल्ह्याचे काय आहे, यासंदर्भात आम्हाला लेखी खुलासा देण्यात यावा' , असे जाधव यांनी जिल्हाधिकारी यांना पत्र लिहले होते. ज्यालाच उत्तर देतांना औरंगाबाद नामांतराबाबतचे कुठलेही राजपत्र नसल्याचं जिल्हा प्रशासनाकडून खुलासा करण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment