या विषयी पाठविलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, आपल्या भारत देशातील एक प्रमुख राजकीय पक्ष असलेल्या भाजप च्या निलंबित राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्माने मुहम्मद पैगंबरांबाबत अत्यंत असभ्य व आक्षेपार्ह विधाने करून पैगंबरांची विटंबना केली आहे. जी कदापिही माफी योग्य नाही. लक्षात असूद्या आम्ही सर्वजण वेगवेगळ्या धर्मांना मानणारे भारतवासी आहोत, अखंड भारताचे हितैशी आहोत. आम्हा सर्वांना एक दुसर्याचे धर्म व धर्मगुरूंबद्दल आस्था व सन्मान असायला हवे. ते आपल्या सर्वांचे नैतिक कर्तव्य व उत्तरदायित्व आहे. आपल्या भारतात राहणारी प्रत्येक व्यक्ती मग ती कुठल्याही समाज व कुठल्याही धर्माची असो त्याने आपले देश हित लक्षात घेऊनच आपले आचरण ठेवणे जरुरी आहे. परंतु या सर्व गोष्टींना नुपुर शर्मा सारखे काही लोक गालबोट लावून इस्लाम धर्म व पैगंबरांबाबत तोंडाला येईल ते बरळत सुटतात. त्यांच्या अशा वक्तव्यांमुळे असे लोक फक्त आपल्या भारताचेच नाही तर संपूर्ण जगातील वातावरण खराब करू लागले आहेत. ज्यामुळे आपल्या भारत देशाला जगभरातील इतर देशांसमोर शरमेने मान खाली घालावी लागत आहे. नुपुर शर्मा सारख्या लोकांनी तोंडाला येईल ते बरडल्याने आपल्या भारत देशाची अनेक उत्पादने इतर देशांनी बहिष्कृत केली आहेत. शिवाय आपला देश सोडून इतर देशात जाऊन रोजीरोटी कमावणाऱ्या भारतीय मूळच्या नागरिकांना इतर देशांनी नोकरीवरून कमी करत भारतात परत पाठवीत असल्याची घोषणा सुद्धा केली आहे. असे जर झाले तर अगोदरच रोजगार आणि व्यवसायात संघर्ष करत असलेल्या आपल्या देशाला मोठे नुकसान सोसावे लागेल. यामुळे सद्य स्थितीत असलेल्या बेरोजगारी मध्ये वाढ होऊन आणीबाणीची परिस्थिती उद्भवू शकते. या सर्व बाबींकडे पाहता भाजपने निलंबित केलेल्या प्रवक्त्या नुपुर शर्मा वर कडक कारवाई करून मुहम्मद पैगंबरांसारख्या आदरणीय व्यक्तिमत्त्वाबद्दल असभ्य व आक्षेपार्ह विधाने केल्याने त्यांला शिक्षा देण्याकरिता आवश्यक ती कारवाई करण्यात यावी. भाजपने त्यांना पक्ष प्रवक्त्या पदावरून निलंबित जरी केले असले तरी ही कारवाई पर्याप्त नाही. तसेच या कारवाई मुळे मुहम्मद पैगंबर यांचे विडंबन कमी होत नाही. म्हणून भारत देशाचे राष्ट्रपती, प्रधानमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल व मुख्यमंत्री या नात्याने आपण सर्वांनी याप्रकरणी नुपुर शर्मा वर कडक कारवाई करून आवश्यक ती शिक्षा देणे गरजेचे आहे. अशी मागणी जमाअ्त ए महेदवीया दायरा कब्रस्तान कमेटी, बीड ने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल व मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनातून केली असून निवेदनावर कमेटी अध्यक्ष शेख परवेज़, सचिव मोहम्मद युसूफ़, कोषाध्यक्ष मोहम्मद आरेफ़, शेख क़दीर, शेख नसीर या सदस्यांची नावे व सह्या आहेत
No comments:
Post a Comment