Monday, June 6, 2022

नोटांवरुन महात्मा गांधींचा फोटाे हटणार..? ‘आरबीआय’कडून मोठा खुलासा…!

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एका गोष्टीची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु होती. ती म्हणजे, भारतीय चलनी नोटांवर लवकरच रवींद्रनाथ टागोर व डाॅ. एपीजे अब्दुल कलाम यांचेही फोटो असतील, असे वृत्त माध्यमांतून प्रसिद्ध होत आहे. त्यामुळे नोटांवरुन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा फोटो काढला जाणार का? असा प्रश्न उपस्थित होत होता..

आरबीआय (RBI), सिक्युरिटी प्रिंटिंग आणि मीटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एसपीएमसीआयएल) यांनी महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर आणि एपीजे कलाम यांचे दोन वेगवेगळे वॉटरमार्क सेट ‘आयआयटी, दिल्ली’ला पाठवले आहेत. प्रा. दिलीप टी साहनी यांना त्यापैकी एकाची निवड करण्यास सांगण्यात आले आहे

.नंतर हा प्रस्ताव केंद्र सरकारसमोर ठेवता जाणार असून, त्यावर केंद्र सरकार अंतिम निर्णय घेणार आहे. 2020 मध्येच ‘आरबीआय’ अंतर्गत समितीने महात्मा गांधी यांच्याशिवाय रवींद्रनाथ टागोर व एपीजे कलाम यांच्या फोटाेच्या नोटा छापण्याची शिफारस केली होती, असे वृत्त व्हायरल होत होते.

आरबीआय’चा खुलासा

भारतीय रिझर्व्ह बॅंक अर्थात ‘आरबीआय’ने एक निवदेन जारी करुन या वृत्ताचे खंडन केलं.. या निवेदनात असं म्हटलंय, की ‘प्रसार माध्यमांमधून असं वृत्त दिले जातंय, की ‘आरबीआय’ सध्याच्या चलनी नोटांवरील महात्मा गांधी यांचा फोटो बदलून अन्य महापुरुषांच्या फोटोसह नोटा छापण्याची तयारी करीत आहे. माध्यमांमधून प्रसारित होत असलेली ही माहिती चुकीची असून, असा कोणताही प्रस्ताव ‘आरबीआय’समोर नसल्याचे या केंद्रीय बॅंकेने स्पष्ट केलंय.

No comments:

Post a Comment