Friday, June 3, 2022

लिंबागणेश सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी रविंद्र निर्मळ यांची बिनविरोध निवड ग्रामपंचायत तर्फे सत्कार.

____
लिंबागणेश  (प्रतिनिधी) : लिंबागणेश दिनांक ३१ मे  मंगळवार रोजी लिंबागणेश येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी शिवसेनेचे युवा नेते तथा आंबेडकरवादी नेते मा. रविंद्र रघुनाथ निर्मळ यांची तर व्हाईस चेअरमनपदी पिंपरनईचे सुंदर धोडींबा वायभट यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर संचालक चेअरमन, व्हाईस चेअरमन यांचा लिंबागणेश ग्रामपंचायतच्या वतीने शेतकरी, सत्कार करण्यात आला. 
सर्वपक्षीय कार्यकर्त्याच्यापुढाकारातून सेवा सोयाटीची निवडणूक बिनविरोध पार पाडण्यात आली. यात शिवसेनेचे ५, राष्ट्रवादीचे २, भाजपा ३ व शिवसंग्रामचे ३ असे एकुण १३ संचालक बिनविरोध निवडून आले.
लिंबागणेश पंचक्रोशितील सर्वात मोठी व जुनी अशी सोसायटी आहे. लिंबागणेश तसेच बेलगाव, पिंपरनई, सोमनाथवाडी, पोखरी, कोळवाडी असून यामध्ये १००० सभासद • आहेत. आतापर्यंत सोसायटी राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेनेच्या, भाजपाच्या ताब्यात होती. यावर्षी • सगळे पक्षाच्या कार्यकत्यांनी व नेत्यांनी एकत्र येवून सोसायटी बिनविरोध काढली. यात नुतन संचालक मंडळ दिंगाबर शेळके, शिवाजी रणखांब, साहेबराव फरताळे, शहाजी फाळके, नवनाथ मुळे, सुंदरराव जाधव, बिबिशन वाणी, रमेश दाभाडे, खिल्लारे लक्ष्मण (दादा) तसेच महिला प्रतिनीधी सौ. शांताबाई पोपटराव पवार, सौ. सोनाली रविंद्र निर्मळ यांचा समावेश आहे.

नुतन चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडीनंतर ग्रा.पं. कार्यालय, आंबेडकर चौक, छ. शिवाजी महाराज चौक, पंचशिल नगर येथे फटाक्याची अतिषबाजी करण्यात आली. त्यानंतर महापुरूषांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी निवडुक निर्णय अधिकारी डावकर साहेब यांनी चोख काम पाहिले तर, गटसचिव अधिकारी सौ. वाघमारे मॅडम यांनी काम पाहिले. लिंबागणेश सेवा सोसायटी बिनविरोध काढण्यासाठी ज्यांनी परिश्रम घेतली, मेहनत घेतली असे भाजपाचे युवा नेते, तालुकाध्यक्ष तथा सरपंच स्वप्निल भैय्या गलधर तसेच पंचायत समितीचे माजी सदस्य राजाभाऊ आप्पा गिरे, पंचायत समितीचे माजी सदस्य बालासाहेब जाधव, समाजरत्न पुरस्कार विजेते मा. डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर, बाळासाहेब वायभट सरपंच पिपरनई. सरपंच बाबासाहेब आप्पा खिल्लारे, बेलगाव सरपंच अश्विनी शेळके, सोमनाथवाडी सरपंच आकाश शेळके, लिंबागणेश माजी सरपंच बाळासाहेब मुळे, शालेय समिती अध्यक्ष मा. सुरेश निर्मळ तसेच उपसरपंच शंकरजी वाणी इत्यादी सर्व पक्षाचे कार्यकर्ते व नेत्यांचे  रविंद्र निर्मळ यांनी आभार मानले. 

No comments:

Post a Comment