____
बीड तालुक्यातील मौजे. लिंबागणेश येथील ग्रामविकास विभाग व पंचायत राज विभाग अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभाग बीड यांच्यामार्फत ग्रामिणभागामधील खुल्या व्यायाम शाळेत मोठ्याप्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाला असून शाळा न बांधताच देयके अदा करण्यात आली आहेत तर काही ठिकाणी गावाच्या बाहेर ग्रामस्थांना उपयोगी नसुन केवळ राजकीय नेत्यांचे बगलबच्चे पोसण्यासाठी पाणी,रस्ता आदि मुलभुत सुविधांची आवश्यकता असताना ते टाळुन खुल्या व्यायाम शाळेच्या माध्यमातून निधीचा अपहार करण्यात आला असून संबधित प्रकरणात दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर व शेख युनुस च-हाटकर यांनी जिल्हाधिकारी बीड,मुख्य कार्यकारी जिल्हापरिषद बीड,विभागीय आयुक्त औरंगाबाद यांना केली आहे.
लिंबागणेश येथील खुली व्यायाम शाळा चोरीला;पोलीस अधिक्षक यांना तक्रार:-डाॅ.गणेश ढवळे
___
बीड तालुक्यातील मौजे लिंबागणेश येथिल ४ लाख रूपये किंमतीची आ.संदिप क्षीरसागर यांच्या फंडातुन ग्रामविकास व पंचायत राज विभाग अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दि.१७ मार्च २०२२ रोजी काम सुरू व दि.१८ मार्च २०२२ रोजी काम पुर्ण झाल्याची नोंद असलेले फलक आमदारांच्या कार्यकर्त्यांच्या गोदामात आढळुन आले असून संबधित प्रकरणात चौकशी करून जबाबदार अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग बीड व कंत्राटदार तसेच देयके अदा करणारांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी केली आहे.
मसेवाडी येथील खुली व्यायाम शाळा गोसावी समाजाच्या स्मशानभुमीत
___
बीड तालुक्यातील मौजे. मसेवाडी येथील आ.फंडातुन ग्रामविकास व पंचायत राज विभाग अंतर्गत खुली व्यायाम शाळा साहित्य गोसावी समाजाच्या स्मशानभुमीत ठेवण्यात आले असल्याबद्दल गोसावी सामाजात तिव्र नाराजी आहे. त्यामुळेच स्मशानभुमीत व्यायाम कोण करणार असा प्रश्न मसेवाडीकर विचारत आहेत??
पंचायत राज समितीला तक्रार, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर व्यायाम आंदोलन
____
बीड जिल्ह्य़ातील संपूर्ण खुल्या व्यायाम शाळेची उच्च स्तरीय स्वतंत्र कमिटीमार्फत चौकशी करण्यात यावी याविषयी पुढील आठवडय़ात येणा-या पंचायत राज समितीला प्रत्यक्ष भेटून तक्रार करणार असुन सोमवार रोजी जिल्हाधिकारीसाहेब कार्यालयासमोर " व्यायाम शाळा आंदोलन करण्यात येणार आहे असून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्ते व्यायाम काढून निषेध व्यक्त करणार.
No comments:
Post a Comment