*अध्यक्ष नरसिंह कानडे, उपाध्यक्ष गणेश मसनाळे,तर सचिवपदी संतोष माणकेश्वर यांची निवड.
अंबाजोगाई (प्रतिनिधी) लिंगायत समाज हटगर कोष्टी समाज अंबाजोगाई शाखेची कार्यकारिणी समाजातील ज्येष्ठ मान्यवरांच्या उपस्थितीत आज रविवार दिनांक 5 जून रोजी जाहीर करण्यात आली. यात अध्यक्षपदी नरसिंह रंगनाथ कानडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
अंबाजोगाई शहरातील कोष्टी गल्ली येथे आज रविवारी सकाळी दहा वाजता महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत लिंगायत हटकर कोष्टी समाज संस्था महाराष्ट्र राज्य शाखा अंबाजोगाईची कार्यकारणी जाहीर करण्यात आली .कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी नरसिंह रंगनाथ कानडे, उपाध्यक्षपदी गणेश विष्णुपंत मसनाळे तर सचिवपदी संतोष बाळकृष्ण माणकेश्वर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उर्वरित कार्यकारणी अशी की, सहसचिव बालाजी विजयकुमार देवळे, कोषाध्यक्ष शुभम शिवदास मसनाळे, संघटक संदीप राधाकिशन शेंगोळे तर प्रसिद्धी प्रमुख पदी अभिलाष बालासाहेब हाट्टे तसेच सदस्यपदी सर्वश्री विशाल गोविंद हाटे ,आशिष शिवाजी काळे ,गणेश शिवाजी धरणे, संदीप नरहरी होट्टे, अक्षय मच्छिंद्र देवळे, दिग्विजय चंद्रकांत कानडे, अमोल रमाकांत शेंगुळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. दरम्यान आज झालेल्या बैठकीत समाजाच्या विविध प्रश्नावर चर्चा करण्यात आली तसेच समाज संघटन वाढीसाठी सर्वांनी पुढे येऊन सहकार्य करावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य लिंगायत हटगर कोष्टी समाज संघटनेचे सदस्य प्रवीण ऊर्फ बाळू उमराणे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री गणेश तरके तर आभार प्रदर्शन मुकूंद तुर्रे यांनी केले.
कार्यक्रमास समाजातील ज्येष्ठ नागरिक.................. यांच्यासह अनेक जण मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष पत्रकार अविनाश मुडेगावकर तर प्रमुखपाहुणे श्री विनोद पोखरकर हे होते यावेळी त्याच्या हस्ते कै. शिवहर होळगे यांना समाजाच्या वतीने जे आवाहन केले होते च्या वाहनातून जमा झालेली रक्कम यांची मुलगी संजीवनी होळगे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली
No comments:
Post a Comment