बीड (प्रतिनिधी) सिंदफणा नदी पात्रातील अवैध वाळू उपसा उत्खनन यामुळे यातील महसूल प्रशासनाचा लाखो हजार रुपयांचा महसूल बुडाला आहे . जिल्ह्यातील महसूल प्रशासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला आहे याचे सर्व पुरावे फोटोसह जिल्हाधिकारी यांना या बैठकीत सादर करण्यात आले आहेत .
याबाबतची सर्व माहिती श्री . अशोक महादेव कातखडे रा. निमगांव (मा ) ता . शिरूर ( कासार ) दि . २३/१०/२०२० ते ०७/०३/२०२२ या वर्षामध्ये निमगांव ( मा ) नांदेवली , माळेवाडी ता . शिरूर ( कासार ) जि . बीड येथील सिंदफणा नदीपात्रातुन बेसुमार अवैध वाळू उपसा उत्खनन होत असल्यामुळे मी लेखी अर्ज वरील नमुद केलेल्या तारखेप्रमाणे महाराष्ट्र शासन व केंद्र शासन यांना वाळु माफियासोबत संगनमत करून शासनाचा कोटयावधी रुपयांचा महसुल बुडविल्यामुळे व पर्यावरणाचा -हास होण्यास जबाबदार असलेले अधिकारी मा. उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर , बीड व मा . तहसिलदार श्रीराम बेडे तहसिल कार्यालय ता . शिरुर ( कासार ) व तलाठी बाबासाहेब बड़े तलाठी सज्जा राळेसांगवी ता . शिरूर ( कासार ) व दादासाहेब आंधळे तलाठी तलाठी सज्जा तितरवणी , ता . शिरूर ( कासार ) व शासकीय गुत्तेदार एन . टी . खेडकर रा . मालेवाडी पो . खरवंडी ता . पाथर्डी जि . अहमदनगर व वाळु माफिया निमगांव ( मा ), नांदेवाली माळेवाडी ता . शिरूर ( कासार ) यांच्या विरुद्ध पुराव्यासह लेखी अर्ज वर नमुद केलेल्या विभागांना देण्यात आलेला आहे . परंतु अद्याप सबंधीतावर कुठलीही कायदेशीर कार्यवाही करण्यात आलेली नाही. याबाबतचे सर्व पुरावे मी २३/१०/२०२० ते ०७/०३/२०२२ या दिलेल्या लेखी पत्रासोबत देण्यात आलेले आहे .
तसेच दि. १३/०३/२०२२ रोजी श्री . गणेश धोक्रट सहाय्यक पोलीस निरीक्षक आर .सी .पी प्रमुख पोलीस अधिक्षक कार्यालय बीड यांनी नांदेवाली ता . शिरूर (कासार ) जि .बीड येथे अवैध वाळू उपसा उत्खनन वाहतुक करताना हायवा टिप्पर पकडलेला आहे . श्री . गणेश धोक्रट सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी जप्त करुन तो हायवा टिप्पर पोलीस स्टेशन शिरुर ( कासार ) यांचे ताब्यात दिला आहे . श्री . गणेश धोक्रट सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी सी .आर .पी .सी . कलम १०२ प्रमाणे २ पंचा समवेत सदरील पकडलेल्या अवैध वाळू वाहतुक हायवा टिप्परचा पंचनामा केला त्यामध्ये ६ ब्रास वाळूने भरलेला हायवा टिप्पर आहे असे स्पष्टपणे नमुद आहे . परंतु तहसिलदार श्रीराम बेडे साहेब शिरूर ( कासार ) यांनी निशांत ठाकुर हे नांदेवाली येथील अधिकारी असताना रायमोहा येथील मंडळाधिकारी बळीराम खंडागळे यांच्याकडे पंचनामा करण्याचे पत्राद्वारे कळवलेले आहे. रायमोह येथील मंडळाधिकारी बळीराम खंडागळे यांनी दि . १५/०३/२०२२ रोजी पंचासमक्ष पोलीस स्टेशन शिरूर ( कासार ) येथे पंचनामा केला व त्यामध्ये अंदाजे ३ ब्रास वाळू आहे असे लेखी पंचनाम्यामध्ये नमुद आहे. तरीही ६ ब्रास वाळू असताना ३ ब्रास कमी दाखवुन शासनाची फसवणुक व दिशाभुल करुन शासनाच्या तिजोरीवर एक प्रकारे दरोडा टाकण्यात आलेला आहे . वाळू माफियांना वाचवण्यात आलेले आहे . त्यामुळे सबंधीत दोषींवर निलंबनाची कार्यवाही करुन महाराष्ट्र शासनाचा जो महसुल बुडवण्यात आलेला आहे तो सबंधीत दोषी अधिकाऱ्यांकडून वसुल करण्यात यावा . तरी या प्रकरणात मा . जिल्हाधिकारी साहेब शासकीय भ्रष्टाचार निर्मुलन समिती अध्यक्ष बीड तात्काळ दखल घेऊन संबंधीत दोषींवरती कठोर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करावी आशी मागणी भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे शिरूर ( कासार ) तालुका अध्यक्ष अशोक कातखडे यांनी केली आहे .
No comments:
Post a Comment