*मान्सून आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र बीड जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा पाणी टंचाईनं डोकं वर काढलं आहे. जिल्ह्याचे तापमानदेखील 42 अंश पर्यंत पोहोचले होते.अशातच पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन झाले आहे.
बीड (प्रतिनीधी) : मान्सून आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र बीड जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा पाणी टंचाईनं डोकं वर काढलं आहे. यंदा सर्वच जिल्ह्यात उन्हाचा पारा तीव्र होता. त्यातच बीड जिल्ह्याचे तापमानदेखील 42 अंश पर्यंत पोहोचले होते. अशातच पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन झाले आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील असणाऱ्या प्रकल्पामधील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात आटला आहे.
याच बीड जिल्ह्याने 2012 आणि 2016 सालामध्ये भीषण दुष्काळाचा सामना केला होता. यावेळी गावोगावी टॅंकरने पाणीपुरवठा केला. आता पावसाचे आगमन काही दिवसांतच होणार आहे. तरीही जिल्ह्यात बोर आणि विहिरीचं मोठ्या प्रमाणात अधिग्रहण करण्यात आले आणि टॅंकरदेखील पाणी पुरवठा होत आहे. बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागात 154 विहिरी आणि बोर अधिग्रहण करण्यात आले आहेत. तसेच बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागात टँकरने पाणीपुरवठा अद्यापही सुरूच आहे.
या' तालुक्यातील सर्वाधिक विहिरी आणि बोर अधिग्रहण केल्या आहे.
जिल्ह्यामध्ये धारूर तालुक्यामध्ये 50 विहीर आणि बोर अधिग्रहण करण्यात आले आहेत. अंबाजोगाई तालुक्यात 34 विहीर आणि बोर अधिग्रहण करण्यात आले आहेत. परळी तालुक्यात 24 तर. केज 34 व नागरी भागांमध्ये 4 विहीर आणि बोर अधिग्रहण करण्यात आले.
जिल्ह्यामध्ये एकूण 144 लघु व मध्यम प्रकल्प आहेत यामध्ये मोठे प्रकल्प म्हणजे माजलगाव व मांजरा प्रकल्प आहेत. मागील वर्षी झालेल्या पावसामुळे सर्वच प्रकल्प तुडुंब भरले होते. यावर्षी उन्हाची तीव्रता जास्त असल्यामुळे पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन झाले आहे. जिल्ह्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा उपयुक्त साठा हा 26. 52 % इतकाच शिल्लक आहे. जिल्ह्यात पाण्याचा मृतसाठा 240.2063 दशलक्ष घनमीटर इतका शिल्लक आहेत. त्यामुळे जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस नाही झाला तर पुन्हा एकदा जिल्ह्याला दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागू शकतात.
No comments:
Post a Comment