Tuesday, March 8, 2022

जागतिक महिला दिनानिमित्त धारुर तालुक्यातील भोपा येथे मनीवाईज वित्तीय साक्षरता केंद्र धारुर च्या वतिने आर्थिक साक्षरता मेळावा संपन्न

.
तेलगाव (प्रतिनिधी) आठ मार्च या जागतीक महिला दिनानिमित्त धारुर तालुक्यातील भोपा येथे मनिवाईज आर्थिक साक्षरतेबाबत आयोजन करण्यात आले होते.
    महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा तेलगाव चे दत्तक गाव भोपा येथे ग्रामपंचायत, अंगणवाडी, आरोग्य सेवा भोपा यांच्या सहकार्याने आणि आदरणीय जोगदंड सविता मॅडम मनीवाईज केंद्र  व्यवस्थापक परळी (वै) यांच्या मार्गदर्शनाखाली मनीवाईज आर्थिक साक्षरता केंद्र धारुर यांच्या वतीने भोपा येथे महिलांची आर्थिक साक्षरतेबाबत कार्यशाळा आयोजित केली  होती. 
     या कार्यक्रमाचे मार्गदर्शक मनीवाईज आर्थिक साक्षरता केंद्र धारूर तालुका समन्वयक मा. अश्विनकुमार डावरे हे उपस्थित होते. आदरणीय डावरे सरांनी आर्थिक साक्षरतेबाबतच्या कार्यशाळेत दिर्घकालीन आर्थिक जागरुकता आनणे आणि सामाजिक पातळीवर सहभागात्मक आर्थिक शोधवर्तन करणे  यासोबतच ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांना  घरगुती आर्थिक संकल्प तयार करण्याची आणि आर्थिक व्यवहाराच्या दैनंदिन नोंदी ठेवण्याची सवय लावणे, सरकारच्या विविध योजनाची माहिती देऊन सुकन्या समृद्धी योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, आणि अटल पेन्शन योजना याबरोबरच मुद्रा कर्ज योजना तसेच बचत आणि गुंतवणूकी बरोबरच शासनाच्या विविध योजना  संदर्भातही महिलांशी संवाद साधला .
     सदरील मनीवाईज आर्थिक साक्षरतेच्या बाबतीत असलेल्या कार्यक्रमामध्ये गावातील महिला बचत गट, पुरुष बचत गट, अंगणवाडी, शेतकरी, शेतमजूर, अल्पभूधारक, गावातील युवक, युवती, ग्रामपंचायत सदस्य,  सोसायटी सदस्य इत्यादींनी सहभाग नोंदवाला.
     या कार्यक्रमाचे अध्यक्ष गावच्या सरपंच आदरणीय अनिता ताई तिडके होत्या तर प्रमुख पाहुणे उपसरपंच कल्याण बापु वाघचौरे हे होते. याच बरोबर आशा कार्यकर्ती प्रथमा ताई उजगरे तसेच अंगणवाडी कार्यकर्ती लक्ष्मी विष्णू वाघचौरे, मुळे कुसुमबाई आश्रुबा तर महाराष्ट्र ग्रामीण बँक चे बी.सी. वैभव भैय्या वाघचौरे आरोग्य विभाच्या मुळे मॅडम बरोबरच गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment