परळी वैजनाथ (प्रतिनिधी) आपल्या वारकरी सांप्रदायाने सन्मानाची शिकवण दिलेली असून हाच आदर्श पुढे घेत चुल आणि मुल या समीकरणातून बाहेर पडत अनेक महिलांनी नेत्रदिपक असे काम केले आहे त्यांचा सन्मान करताना आज आपणास आनंद आहे असे मत अ.भा.वारकरी मंडळाचे मराठवाडा अध्यक्ष ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे यांनी व्यक्त केले.
परळी पोलीस ठाण्यात झालेल्या एका कार्यक्रमात सौ.कल्पनाताई चंदुलाल बियाणी, सुनिताताई नरंगळकर, सुनिताताई बनसोडे यांना आदर्श महिला पुरस्कार पोलिस निरीक्षक उमाकांत कस्तुरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्षा सौ.सरोजनीताई हालगे, रा.काँ.महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ.संगिता तुपसागर उपस्थित होत्या. यावेळी सत्कारमुर्तींना स्मृतीचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमास सौ.भारतीताई बियाणी, सौ.अर्चनाताई सोनी, सौ.भारतीताई दहिवाळ, विजयाताई दहिवाळ, सौ.चेतनाताई गौरशेटे, सौ.प्रेमाताई बाहेती, सौ.दीपाताई बाहेती, सौ.चित्राताई देशपांडे, सौ.वंदनाताई कांबळे, सौ.श्रद्धा कांकरिया, सौ.माधुरी गित्ते, सौ.मानसी जोशी, सौ.मीराताई विटेकर, सौ.गीताताई कोटलवार, सौ.मीराताई चौधरी उपस्थित होत्या.
No comments:
Post a Comment