*महिलांना आत्मनिर्भर आणि कणखर होण्याची गरज-उपसभापती जानिमियाँ कुरेशी .
परळी वैजनाथ (प्रतिनिधी); जागतिक महिला दिनानिमित्त परळी पंचायत समिती येथे महिला कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.
पंचायत समिती येथे उपसभापती जानिमियाँ कुरेशी यांच्या दालनात मंगळवार, दि.08 मार्च रोजी जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने पंचायत समिती महिला कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून शुभेच्छा दिल्या. दरम्यान पंचायत समितीचे सभापती बालाजी उर्फ पिंटू मुंडे, पंचायत समितीचे उपसभापती जानिमियाँ कुरेशी, गटविकास अधिकारी संजय केंद्रे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी बोलतांना उपसभापती जानिमियाँ कुरेशी म्हणाले की, महिला स्वकर्तुत्वावर उभ्या रहात आहेत.त्यांनी सर्व क्षेत्रामध्ये गरुड भरारी घेतली आहे. महिलांना आता चांगला सन्मानही मिळत आहे.पण महिलांनी आत्मनिर्भर आणि कणखर होण्यासाठी प्रयत्न करावा असे मत उपसभापती जानिमियाँ कुरेशी यांनी मानले. यावेळी पंचायत समिती सदस्य मोहनराव सौळंके,मोहनराव आचार्य, वसंत तिडके, शिंदे, माजी नगरसेवक अजिज कच्छी, माऊली पाटील मुंडे, युनुस बेग, दराडे, अजय बळवंत व इतर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment