Tuesday, March 8, 2022

स्त्री शक्ती प्रतिष्ठाणच्या विधातेताईं कडून महिला दिनाच्या पूर्वसंध्येला महिला कार्यकर्तत्वाचा सन्मान - डॉ. सारीकाताई क्षीरसागर.


*जयश्री विधातेंच सर्वव्यापी  स्त्री संघटन - प्राचार्या सत्यभामाताई बांगर.

बीड (प्रतिनिधी) महिला दिनाच्या पूर्वसंध्येला स्त्री- शक्ती प्रतिष्ठान बीडच्या अध्यक्षा तथा नगरसेविका सौ. जयश्री विलास विधाते आणि पसायदान सेवा प्रकल्प ढेकणमोहाचे संचालक गोवर्धन दराडे यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मश्री सिंधुताई सपकाळ (माई) सेवारत्न पुरस्काराने बीड शहर आणि परिसरातील समाजाच्या विविध क्षेत्रात आपल्या कार्य कर्तृत्वाचा ठस्सा उमटणाऱ्या भगीनींना पद्मश्री डॉ सिंधुताई सपकाळ (माई) सेवारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
       काही दिवसांपूर्वीच अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांनी जगाचा निरोप घेतला त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन बीड शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पसायदान सेवा प्रकल्प तसेच सर्व स्तरातील महीला भगीनींना संघटीत करुन विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या स्त्री-शक्ती प्रतिष्ठान बीड यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बीड शहर आणि परिसरातील साधारण वीस भगीनींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला डॉ. सारीकाताई क्षीरसागर , प्राचार्या सत्यभामाताई बांगर , नगराध्यक्षा सौ वंदनाताई जगताप , सभापती उषाताई सरवदे , शांतीनिकेतनच्या संचालि कावेरी ताई नागरगोजे , वर्षाताई ठाकुर यांच्या उपस्थिती लाभली. 
      कार्यक्रमाची सुरुवात  सावित्रीबाई फुले आणि सिंधुताई सपकाळ यांच्या प्रतिमा पुजा आणि दिप प्रज्वलनाने झाली. प्रदेश प्रमाणे मान्यवरांचे आयोजकांच्या वतीने शेला हार फेटा शिल्ड देऊन सत्कार करण्यात आला तर पुरस्कार प्राप्ती भगींनींना शेला हार फेटा सन्मानपत्र बहाल करुन सन्मानित करण्यात आले. यानंतर पसायदान सेवा प्रकल्पाच्या आजवराच्या प्रवासाचे साक्षीदार राहीलेले गिरीसर यांनी प्रकल्पाच्या कार्याचा आढावा घेतला तर स्त्री - शक्ती प्रतिष्ठान आणि नगरपालीकेच्या माध्यमातून महीला व बालकांना केंद्र स्थानी ठेवून प्रतिष्ठानने केलेल्या कामाचा लेखाजोखा सौ. जयश्री विलास विधाते यांनी मांडला. पुरस्कार प्राप्ती सोनम ताई तांदळे यांनी सर्व पुरस्कार प्राप्तीच्या वतीने आपले मनोगत व्यक्त करताना दिलेल्या मानसन्माना बद्दल ऋण व्यक्त केले तर डॉ. सारीकाताईंनी पुरस्कार प्राप्ती महीला भगीनींचे अभिनंदन करत अडल्या - नडल्या गरजू भगीनींना पाठबळ देण्यासाठी सदैव तत्पर राहू अशी ग्वाही दिली. आपल्या बहारदार भाषाशैलीत प्राचार्या सत्यभामाताई बांगर यांनी महीला भगींनींना कानमंत्र देत पडद्या आडून बाप - भाऊ - पती - पुत्र यांना नात्याने सदैव पाठीशी खंबीरपणे उभे असणाऱ्या भावांच आभार मानायला विसरल्या नाहीत. त्याच बरोबर नगरसेविका सौ जयश्री विधातेंच्या जनसंपर्क आणि संघटन कौशल्याचे तोंडभरून कौतुक करत आपण करत असलेल्या सामाजिक उपक्रमात सदैव आपल्या पाठीशी राहुल असे आश्वासन दिले. या कार्यक्रमाला प्रा. संगीताताई शिंदे यांच्या  बहारदार सुत्रसंचलनाची साथ लाभली तर  दोन अडिचशे महीला च्या उपस्थिती तील या कार्यक्रमाला शेकडो बांधवांचा हातभार लागला होता असा आगळावेगळा कार्यक्रम पाहाण्याचे भाग्य लाभल्याचे समाधान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसून येत होते.

1 comment: