Friday, March 18, 2022

आमदार अँड लक्ष्मण पवार यांच्या मातोश्री चे निधन..! विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून नातेवाईकांकडून सांत्वन.

गेवराई -(प्रतिनिधी)  गेवराई तालुक्यातील तथा मतदार संघाचे आ.अँड लक्ष्मण पवार यांच्या मातोश्री आईचे प्रमिलाताई माधवराव पवार यांचे अल्प आजाराने दि.18 मार्च 2022 रोजी दुःखद निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय- 76 होते.
गेवराई  मतदार संघाचे माजी आमदार माधवराव पवार यांच्या पत्नी तथा लोकनेते बाळराजे पवार Balraje Pawar आणि विद्यमान आमदार अँड लक्ष्मण पवार यांच्या मातोश्री प्रमिलाताई माधवराव पवार यांचे निधन झाले. वयोमानानुसार आणि काही आजारामुळे औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान दि.18 जानेवारी 2022 रोजी सकाळच्या सुमारास 05:10 वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, दोन मुली, पुतणे, नातवंडे, असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर गेवराई शहरातील कोल्हेर रोड येथील फॉर्म हाऊस शेतात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. 

त्यांच्या या अकाली निधनाने पवार कुटुंबावर अन् गेवराई Gevrai शहरावर दुःखांचा डोंगर कोसळला आहे. कारण प्रमिलाताई माधवराव पवार Parmilatai Madhavrao Pawar ह्या शहराच्या सुख दुःखात सहभागी होत असे. तसेच पवार घराण्यांचा आदर्श विचारांचा वारसा चालवत होत्या.   शहरातील गोरगरीब तसेच अडी अडचणीतील नागरिक महिला असो किंवा कुटुंबियांना आधार देण्यासाठी काम करत असे.  नातेवाईक, शहरासह तालुक्यातील गावातील नागरीक, जेष्ट नागरिकांनी आपल्या भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आल्या.कांतीकारी साथी व मगर परिवार पवार यांच्या दुःखात सहभागी आहे.

No comments:

Post a Comment