* गाववाल्यांनी जावयाची गाढवावरून काढली मिरवणूक परंपरा ठेवली कायम.
केज -(प्रतिनिधी) केज तालुक्यातील विडा येथे आज बँक कर्मचारी असलेल्या जावयाची गाढवावर बसवून गावभर वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली आहे.
वर्षानुवर्षे चालत आलेली हि परंपरा याही वर्षी कायम करण्यात आली आहे. बँकेत कर्मचारी असलेले अमृत धनंजय देशमुख यांना हा मान मिळाला आहे. दरवर्षी धुलीवंदनाच्या दिवशी जावायाची शोधाशोध करून मग गाढवावर बसवून त्यांची वाजतगाजत गावभर मिरवणूक काढण्याची परंपरा आहे ती परंपरा याही वर्षी साजरी केली आहे. या जावयास नवीन कपडे करून अशाप्रकारे मिरवणूक काढण्यात येते. या निमित्ताने एक वेगळा आनंद मिळतो. दोन दिवस आधिच जावयाची शोधाशोध चालू असते. गाढव शोधून मग त्यावर बसवून जावयाची मिरवणूक काढण्याची येथे अनोखी परंपरा चालू आहे.
No comments:
Post a Comment