Friday, March 18, 2022

पारंपारिक होळीला बगल देत मनसेचे शहराध्यक्ष वैजनाथ कळसकर यांच्या संकल्पनेतून साजरी गुटख्याची होळी.


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) मनसेच्या वतीने पारंपरिक होळीला बगल देत मानवी शरीरास अत्यंत घातक असलेल्या गुटखा या विषारी पदार्थाची होळी करण्यात आली.
वास्तविक पाहता सरकार कडून पूर्णपणे बंदी घालण्यात आलेला गुटखा सर्रासपणे गल्ली बोळा सहित मोठमोठ्या चौकात खुलेआम चालूच आहे.
नावापुरती बंदी असून महाराष्ट्र सरकार हा विषारी गुटखा बंद करण्यात सपशेल अकार्यक्षम ठरले असल्या बद्दल मनसे चे परळी शहराध्यक्ष वैजनाथ कळसकर यांनी महाराष्ट्र सरकारचा निषेध व्यक्त करत राणी लक्ष्मीबाई टॉवर चौकात गुटख्याची होळी केली.
या प्रसंगी संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष देवराव लुगडे महाराज, शहराध्यक्ष सेवकराम जाधव, वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष संजय गवळी, काँग्रेसचे युवक शहराध्यक्ष गुड्डू खोसे सर, वंचित बहुजन आघाडी शहर उपाध्यक्ष संदीप भाऊ ताटे, सामाजिक कार्यकर्ते ॲड.अर्जुन सोळंके, मनसे शहर उपाध्यक्ष गणेश चव्हाण, वंचित बहुजन आघाडी  प्रसिद्धीप्रमुख धम्मा पैठणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment