Friday, March 18, 2022

तरूणांना ही लाजवेल असा गावाचा विकास करणारे. आदर्श गाव करणाऱ्या. सौ.वत्सलाबाई कोकाटे यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार जाहिर.

* 20 मार्च रोजी अहमदनगर येथे होणार वितरण.

परळी वैजनाथ (प्रतिनीधी) परळी तालुक्यातील संगम गावचा सर्वांगीण विकास साधत आदर्श गाव निर्माण करणार्या माजी सरपंच सौ.वत्सलाबाई कोकाटे यांची स्वराज्य सरपंच सेवा संघाच्या वतिने दिल्या जाणार्या राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कारासाठी निवड झाली असुन आमदार निलेशजी लंके साहेब ,आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील  व मान्यवरांच्या हस्ते दि.20 मार्च रोजी अहमदनगर येथे या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
 परळी तालुक्यातील संगम या गावच्या सरपंचपदाची जबाबदारी सांभाळली असतांना अनेक अडचणीवर मात करत अ.भा.वारकरी मंडळाचे मराठवाडा अध्यक्ष ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे यांच्या मातोश्री सौ.वत्सलाबाई वैजनाथराव कोकाटे यांनी गावात अनेक विकास योजना राबवल्या त्यांच्या सरपंच पदाच्या कार्यकाळात गावात मुख्य रस्त्याची विकासकामे,महादेव मंदिर  येथे सभागृह,बौध्द विहार सभागृह,गावात दहा लाख रुपयांचे हायमास्ट दिवे बसवुन संपुर्ण गाव लखलखीत केले.संरक्षण भिंत,स्मशानभुमी कंपाऊंड वॉल,शाळा रंगरंगोटी व दुरुस्ती,सिंमेट रस्ते,पेवरब्लॉक,पाणी अडवा पाणी जिरवा यासाठी जागोजागी शोष खड्डे,गावातील रस्त्यावर वृक्षारोपण,नाना- नानी पार्क,स्मशानभुमी बांधकाम,प्रत्येक वॉर्डात पिण्याच्या पाण्यासाठी पाणी टाकी या विकास कामाबरोबरच गावामध्ये शिवजयंती,डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती,बौध्द पौर्णिमा अशा प्रसंगी अनेक सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम घेवुन कोरोना काळात औषध फवारणी,मास्क वाटप असे उपक्रम राबवत संगम या गावला आदर्श गाव म्हणुन दर्जा मिळवुन दिला.त्यांच्या या कार्याची दखल म्हणुन स्वराज्य सरपंच सेवा संघाच्या वतिने दिल्या जाणार्या राज्य स्तरीय आदर्श सरपंच पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.दि.20 मार्च रोजी दुपारी 12 वा. माऊली संकुल सभागृह सावेडी,अहमदनगर येथे या पुरस्काराचे आमदार निलेशजी लंके साहेब, आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील ,पद्मश्री राहिबाई पोपेरे,यादवराव पावसे यांच्या हस्ते व ग्रामसेवक युनियनचे राज्याध्यक्ष एकनाथ ढाकणे,बाबासाहेब पावसे,होमिओपॅथीक मेडिकल कॉलेजचे अध्यक्ष राधेश्याम गुंजाळ,ह.भ.प.राजेंद्र गरुड महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत वितरण होणार आहे.या राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे न्याय मंञी तथा बीड जिल्हा व भरभणी जिल्हाचे पालकमंत्री ना.धनंजयजी मुंडे साहेब  यांनी फोन व्दारे अभिनंदन व कौतुक केले व शुभेच्छा दिल्या  ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे व सौ.वत्सलाबाई कोकाटे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment