*प्रत्येक महिन्याचे राशन हे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात वाटप करण्यात यावे-देवराव लुगडे महाराज..!
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) प्रत्येक महिन्याचे स्वस्त धान्य (राशन) हे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात वाटप करण्यात यावे. अशी निवेदनाद्वारे मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे.मार्च 2022 चे राशन वाटप 15 मार्च पर्यंत लाभार्थ्यांना मिळणे अपेक्षित होते पण तसे झाले नाही. 17 तारखेला होळीचा सण असल्याने तत्पूर्वी राशन वाटप होणे अपेक्षित होते. परंतु गोरगरिबांना शासनाने राशन पासून वंचित ठेवले असेच म्हणावे लागेल. सणासुदीच्या काळात पुरण पोळी खाण्या ऐवजी गोरगरिबांनी पिठलं भाकरी खावी का ? असा सवाल सुद्धा याप्रसंगी संभाजी ब्रिगेडच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे.
यापुढे दर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात लाभार्थ्यांना राशन पुरवठा करण्यात यावा अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज व शहराध्यक्ष सेवकराम जाधव सर यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
No comments:
Post a Comment