Thursday, March 17, 2022

हजरत शहंशाह वली दर्गाह वक्फ घोटाळ्यातील आरोपींना तपाशी अंमलदार खाडेंचं अभय.

* कोर्टात गैरहजर;न्यायालयाने नाराजी व्यक्त केली :-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर.

बीड ;- वक्फ बोर्डच्या ४०९ एक्कर जमिन गैरव्यवहार प्रकरणातील ३ आरोपींना आज दि.१७ मार्च गुरूवार रोजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी बीड न्यायालयात हजर करण्यात आले होते,परंतु तपासी अंमलदार आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे न्यायालयात गैरहजर राहीले ऐनवेळी नविन पोलीस उपनिरीक्षक श्री.बडे यांना आरोपी समवेत कोर्टात पाठवण्यात आले होते, परंतु त्यांना गुन्ह्याच्या तपासाबद्दल काहीच सांगता आले नाही, याबाबत कोर्टाने नाराजी व्यक्त केली तरीही कोर्टाने आरोपींना २ दिवस पोलीस कोठडी दिली. 

सविस्तर माहीतीस्तव 
___
दर्गा हजरत शहंशावली दर्ग्याची १० एकर जमिन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ लगत सर्व्हे क्र. २२ व ९५ मध्ये असून महामार्गाच्या चौपदरीकरणात या जमिनीचा सुमारे १५ कोटी रूपये नुकसान भरपाई आली होती ती रक्कम हडपण्यासाठी गैरव्यवहार केल्याचे जिल्हा वक्फ आधिकारी अमीनजुम्मा खलीखुजमा यांच्या तक्रारीवरून २९ डिसेंबर २०२१ रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तत्कालीन उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव पाटील, तत्कालीन तहसिलदार, मंडळ आधिकारी, तलाठी असे आठ आधिकारी-कर्मचारी व ईतर ७ अशा ऐकुन १७ जणांवर गुन्हा नोंद आहे .

 हरिभाऊ खाडेंना गांभीर्य नाही एकतर आरोपींना अटक नाही आणि न्यायालयात गैरहजर;गृहमंत्री, पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक यांना तक्रार:-डाॅ.गणेश ढवळे 
___
बीड जिल्ह्य़ातील विविध धार्मिक इनामी जमिन गैरव्यवहार प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते ,संघटना जीवावर उदार होऊन तक्रारी, आंदोलनानंतर गुन्हे दाखल झाल्यानंतर न्यायालयात गैरहजर राहुन एकप्रकारे भ्रष्टाचा-यांची पाठराखण करणे पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांच्यामार्फत सुरू असून एकतर एकही आरोपींला स्वत: अटक केली नाही आणि स्वतःहुन अटक आरोपींना सहकार्य करण्याच्या दृष्टिकोणातुन न्यायालयात गैरहजर राहणे म्हणजे खाडेंना याचे गांभीर्य नसुन संबधित प्रकरणात पोलीस अधीक्षक बीड यांच्यामार्फत गृहमंत्री, पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक यांना पोलीस अधिक्षक बीड यांच्यामार्फत तक्रार केली आहे. 

No comments:

Post a Comment