Thursday, March 17, 2022

बीजउत्सव सप्ताह कार्यक्रमात विठोबा, तुकोबा-ज्ञानोबाचे नाम जपा:- महादेव महाराज बोराडे शास्त्री


केज ( प्रतिनिधी) तालुक्यातील प्रतिदेहू श्री क्षेत्र संत तुकोबाराय पावनधाम येथे बीजोत्सवाच्या सप्ताह कार्यक्रमात दररोज दुपारी दोन ते चार वेळात भागवत कथा सांगण्यात येते. भागवत  कथा कार्यक्रमाच्या पाचव्या दिवशी उपस्थित भाविक भक्तांना कथा सांगतान ह.भ.प.महादेव महाराज बोराडे शास्त्री म्हणाले की,विठोबा, तुकोबा-ज्ञानोबाचे नाम जपत रहा ; म्हणजे देव तुम्हाला जपत राहिल.पुण्य कर्माची फळे नेहमीच गोड  असतात. पुढे बोलताना ते म्हणाले की, हरिनाम संकीर्तन हे साधन फार सुलभ व सोपे आहे. त्यायोगाने अनेक जन्माची पापे पळून जातील. कथा कार्यक्रमातून महंत महादेव महाराज बोराडे शास्त्री कथे बरोबरच अनेक ज्वलंत विषयांस  सहजपणे स्पर्श करत आहेत.यात प्रामुख्याने वृक्षारोपण, स्वच्छता, संस्कार यांसारख्या विषयांचा  समावेश असतो. कथेस साथ संगत सूर्यकांत  महाराज करदुरे, हनुमंत महाराज देशमुख, पांडुरंग महाराज शिंपले यांची लाभते. कथा कार्यक्रमास पंचक्रोशीतील भाविकांची उपस्थिती असते. कथा कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमोल जाधव महाराज, जनार्धन महाराज चलवाड, अशोक महाराज,हनुमंत महाराज सिरसाट,दिलीप शिंदे,भागवत शिंदे,सुदाम पाटील,पंडित सावंत,सौदागर कदम,सुर्यकांत नांदूरे ,फुलचंद काकडे,शंकर उबाळे,अरूण काळे,गणेश महाराज भगत,प्रशांत निगडे,सचिन पतंगे,उमेश करपे,केशव धनगरे, न्यूज वन महाराष्ट्र चॅनलचे मुलाखतकार संतोष रोकडे ,गणपत पांचाळ हे प्रयत्न करत आहेत.

No comments:

Post a Comment