* उर्वरीत लाईट, दालने, विभागीय मान्यता आदि कामे तात्काळ करा .
बीड (प्रतिनिधी) - जिल्हापरिषद बीड नुतन प्रशासकीय इमारतीमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्यासहीत छत्रपती राजश्री शाहुमहाराज,महात्मा ज्योतीराव फुले, भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर महापुरूषांच्या अर्धकृती पुतळ्यांचे भुमिपुजन केल्यानंतरच लोकार्पण सोहळा करण्यात येऊन उर्वरीत लाईट, अपुर्ण फर्निचर, सभापतींची दालने, अग्निशामक दलासह ईतर विभागातील प्रशासकीय मान्यता प्राप्त करून लवकरात लवकर काम पुर्ण करण्यात यावे यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दि.१७मार्च गुरूवार रोजी नुतन जिल्हापरिषद प्रशासकीय ईमारतीसमोर धरणे आंदोलन करण्यात येत असून आंदोलनात भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष बीड शेख युनुस च-हाटकर, उपाध्यक्ष मराठवाडा ऑल इंडिया पॅथर सेना नितिन सोनावणे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डाॅ.संजय तांदळे, सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद मोईज्जोदीन, शेख मुबीन बीडकर आदि सहभागी होते, निवेदन मुख्य कार्यकारी आधिकारी जिल्हापरिषद बीड अजित पवार यांना देण्यात आले.
सविस्तर माहीतीस्तव
____
बीड शहरातील नुतन जिल्हापरिषद प्रशासकीय ईमारतीसमोर छत्रपती संभाजी महाराज यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा यासाठी दि.०९ ऑगस्ट २०२१ रोजी मराठा क्रांती मोर्चा बीड व शंभुप्रेमींनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते, त्यामुळेच छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्यासहीत छत्रपती राजश्री शाहुमहाराज, महात्मा ज्योतीराव फुले, भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्यांचे भुमिपुजन केल्यानंतरच नुतन जिल्हापरिषद प्रशासकीय ईमारतीचा लोकार्पण सोहळा करण्यात यावा तसेच जिल्हापरिषद प्रशासकीय ईमारतीतील लाईट, फर्निचर, सभापतींची दालने, अग्निशामक दलासह ईतर विभागातील प्रशासकीय मान्यता घेऊनच उर्वरीत काम लवकरात लवकर पुर्ण करण्यात यावे यासाठी जिल्हाधिकारी बीड, मुख्य कार्यकारी आधिकारी जिल्हापरिषद बीड,पोलीस अधीक्षक बीड यांच्यामार्फत राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे संस्थापक,अध्यक्ष खा. शरदचंद्रजी पवार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, ग्रामविकास मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड यांना देण्यात आले.
अपुर्ण कामाच्या उद्घाटनाचा अट्टहास का? कोनशिलेवर नाव कोरायचा कि जिल्हापरिषद ताब्यात येणार नाही याची भिती?:-डाॅ.गणेश ढवळे
____
पुणे येथील अर्धवट मेट्रोचे लोकार्पण सोहळ्यावेळी सत्ताधा-यांचे वरिष्ठ राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खा. शरदचंद्रजी पवार यांनी टीका केली होती परंतु त्यांच्याच पक्षाचे ग्रामविकास मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री यांनी केवळ कोनशिलेवर नाव कोरण्यासाठी सत्ताधा-यांचा अट्टहास आहे की भविष्यात जिल्हापरिषद आपल्या ताब्यात येणार नाही याची भिती आहे??
ईमारतीतील कामे तर सोडा आवारातील रस्त्यावर पाणी मारायचे काम सध्या चालु
_____
२०१७ पासुन केवळ १७ कोटी अंदाजपत्रकातील रक्कम आता ४० कोटीच्या घरात गेले असुन भविष्यात काम रखडत ५०-६० कोटी पर्यंत केवळ राजकीय नेते -ठेकेदार आणि आधिकारी यांचे खिसे भरण्याचे काम सुरू असून सध्या ईमारतीच्या आवारातील रस्त्यावरील उडता धुराळा पाहता पाणी शिंपडण्याचे काम सुरू आहे.
No comments:
Post a Comment