Saturday, March 12, 2022

बीड जिल्हापरिषद आणि पंचायत समित्यांवर प्रशासकराज मुख्यकार्यकारी अधिकारी अजित पवार यांच्या हाती सुत्रे.


राज्यभरातील जिल्हापरिषद (Beed Zilla Parishad ) आणि पंचायत समित्यांची (Panchayat Samiti)मुदत या महिन्यात संपत आहे . तसेच या संस्थांच्या निवडणूक किमान ४ महिने तरी घेणे शक्य नसल्याचे चित्र असल्याने आता जिल्हापरिषद आणि पंचायत समित्यांवर ४ महिन्यांसाठी प्रशासक नेमण्याचे आदेश राज्य सरकारने (State Governmant) दिले आहेत.

जिल्हापरिषदची (CEO) सूत्रे तर पंचायत समित्यांची सूत्रे गटविकास अधिकाऱ्यांकडे (BDO)दिली जाणार आहे. हेच अधिकारी आता प्रशासकाची भूमिका निभावणार आहेत. बीड जिल्हापरिषदेची सूत्रे आता २१ मार्च पासून मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांच्याकडे असणार आहेत.

No comments:

Post a Comment