Saturday, March 12, 2022

स्व.यशवंतराव चव्हाण हे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार-प्राचार्य प्रा.अतुल दुबे.


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) नाथ शिक्षण संस्था संचलित यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय येथे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्व.यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी करण्यात आली.
दिनांक 12 मार्च 2022 रोजी नाथ शिक्षण संस्था संचलित यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय येथे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती निमित्त प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.या प्रसंगी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.अतुल दुबे म्हणाले की लोकनेते स्व.यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर शिक्षण, सहकार,शेती सह औद्योगिक क्षेत्रांत अनेक उपक्रमांना चालना देऊन विकास करणारे आधुनिक महाराष्ट्राला घडवणारे शिल्पकार आहेत.
या वेळी गाडे पिंपळगाव चे केंद्र प्रमुख के. एन. गुव्हडे ,महाविद्यालयाचे प्रा.अश्विनी मुंडे प्रा.एस.आर.कापसे प्रा. के. एच. जायभाये प्रा.ए.डी.शेख,प्रा.व्ही.एन.शिंदे,प्रा.ए.एन. खाकरे,व्ही.एन.शिंदे,पी. एम.सातपुते,यु.बी.जगताप यांच्या सह विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment