परळी वैजनाथ (प्रतिनिधी) परळी पासून जवळच असलेल्या सिमेंट फॅक्टरी ते बरकत नगर दरम्यान रेल्वे पटरीवर अज्ञात इसमाचा मृतदेह आज बुधवार दिनांक 9 मार्च रोजी आढळला आहे.
आज बुधवारी सकाळी सिमेंट फॅक्टरी ते बरकत नगर रोड नजीक असलेल्या रेल्वे पटरी वर अज्ञात इसमाचा अंदाजे वर 30 मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे . मयत इसमाची ओळख पटलेली नाही. सदर घटना समजतात पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असून पुढील तपास सुरू आहे. सदरील मयताची ओळख पटविण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.
No comments:
Post a Comment