Wednesday, March 9, 2022

गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतुस सह एकास अटक.

सांगली , मिरजेत गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या इसमाला जेरबंद, महात्मा गांधी पोलीस ठाणे पोलिसांची कारवाई , गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतुस सह 80 हजाराचा मुद्देमाल जप्त

मिरजेतरात्री च्या सुमारास महात्मा गांधी चौकी पोलिस गस्त घालत असताना डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान जवळ बेकायदेशीर गावठी पिस्तुल बाळगणाऱ्या इसमाला जेरबंद केले आहे उद्यान जवळ मोटरसायकल वर बसलेल्या तरूणां कडे गावठी पिस्तुल असल्याची उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे व त्यांच्या पथकाला ही गोपनीय माहिती मिळाली होती त्यानुसार पथकाने तरुणाला गावठी पिस्तुल सह जेरबंद केले गणेश मोहन केंगार वय 20 राहणार जाकापूर कवठेमहांकाळ असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे दोन जिवंत काडतुसे गावठी पिस्तुल , मोटारसायकल असा 1 लाख 34 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे ही कारवाई पोलीस उपविभागीय अधीक्षक अशोक वीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सहाय्यक निरीक्षक रविराज फंडणीस , उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे, सुभाष पाटील, उदय कुलकर्णी, चंद्रकांत गायकवाड, , सचिन कुंभार, बस्वराज कुंडणगोळ, अभिजित पाटील, बाळासाहेब निळे, सलीम शेख यांनी ही कारवाई केली आहे

No comments:

Post a Comment