Friday, March 18, 2022

दारूच्या नशेत कार आणि मोटार सायकल चा अपघात दोघेजण जखमी.




* साळेगावच्या शंकर विद्यालया जवळ कार व मोटार सायकल अपघात.

केज (प्रतिनिधी) :- दारू पिऊन मोटार सायकल चालवून एका चालत्या कारला धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटार सायकल वरील दोघे जखमी झाले आहेत.

या बाबतची माहिती अशी की, दि. १८ मार्च शुक्रवार रोजी सायंकाळी ६:३० वा. दरम्यान केज-कळंब रोडवर साळेगाव येथील शंकर विद्यालया जवळ केज कडून येत असलेल्या चालत्या स्विफ्ट डिझायर गाडीला क्र. (एम एच-०४/एफ-४९५५) मोटारसायकल गाडीची धडक झाली. यात युनूस बागवान आणि चंद्रकांत दहातोंडे या दोघा मोटार सायकल स्वार यांच्या पायाला मार लागून जखमी झाले आहेत.

या अपघाताची माहिती परमेश्वर लांडगे आणि फेरोज सय्यद यांनी पत्रकार गौतम बचुटे यांना देताच त्यांनी केज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांना दिली. त्या नंतर तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महादेव गुजर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक इनामदार, अशोक नामदास, अशोक गवळी हे सरकारी वाहनाने घटना स्थळी हजर झाले. दरम्यान जखमी मोटार सायकलस्वार युनूस बागवान व चंद्रकांत दहातोंडे यांना साळेगाव येथील संतोष मेडकर व दिनकर पोपळघट यांनी त्यांना साळेगाव येथील खाजगी रुग्णालयात नेऊन प्रथमोपचार केले.

No comments:

Post a Comment