जालना (प्रतिनिधी) महाविकास आघाडीचे 25 आमदार अधिवेशनावर बहिष्कार टाकणार होते, पण ते सावरले आणि त्यांनी बहिष्कार टाकला नाही. पण निवडणुका लागल्या की एक-एक भाजपच्या वाघोरीत येऊन पडतील, असा दावा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा वाढदिवस आणि धुळवड आज साजरी करण्यात आली. यावेळी त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत महाविकास आघाडी आणि शिवसेनेवर निशाणा साधला.
रावसाहेब दानवे म्हणाले, ज्यांची मौत आली, ते खड्ड्यात जातील. भाजपमध्ये असे कोणीच नाहीत ज्यासाठी हे खड्डे खोदू शकतील, खोदता खोदता त्यांच्याच अंगावर न पडो, अशीही टीका त्यांनी केली. मविआचे आमदार संपर्कात आहेत, त्यांची नावं सांगून त्यांची आमदारकी धोक्यात आणायची नाही. जशा निवडणूका लागतील तसे ते सर्वजण भाजपमध्ये प्रवेश करतील आणि ते आमच्या संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले
No comments:
Post a Comment