Friday, March 18, 2022

पोलिस दलात खळबळ ; पोलीस कर्मचार्‍याची विष पिऊन आत्महत्या.


नगर (प्रतिनिधी) पोलीस अधीक्षक कार्यालतील एका कर्मचार्‍याने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडल्यामुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. पुणे येथे उपचारादरम्यान आज त्याचे निधन झाले. दरम्यान आत्महत्याचे कारण समजू शकले नाही.
सोमनाथ कांबळे (वय ४५) असे मयत कर्मचार्‍याचे नाव आहे. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे.पोलिस अधीक्षक कार्यालयातील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागात कार्यरत असलेल्या सोमनाथ कांबळे या पोलिस कर्मचार्‍याने चार दिवसापूर्वी १२ मार्च रोजी एमआयडीसीत परिसरामध्ये विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.
पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर तत्काळ पोलिसांनी त्याला नगरच्या एका खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले होते. त्याची प्रकृती अचानक खालावल्यामुळे त्याला पुण्याच्या रुबी हॉल येथे उपचारासाठी नेण्यात आले होते.उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. 

दरम्यान, कांबळे यांनी आत्महत्या का केली, याचे कारण अद्यापपर्यंत समजू शकले नाही. या घटनेची माहिती पोलिस अधिकार्‍यांना मिळाल्यानंतर त्यांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. याबाबत गृह शाखेचे पोलिस उपअधीक्षक मेघशाम डांगे यांनी सदरची घटना घडली असून, पोलिस पुढील तपास करत असल्याचे सांगितले.

No comments:

Post a Comment