Friday, March 18, 2022

श्री भैरवनाथ महाराजांच्या मंदिरात होळीचा कार्यक्रम उत्साहात साजरा.



शिरूर  (प्रतिनिधी)  सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील कोरेगाव भीमा, ता. शिरूर येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांच्या मंदिरात होळीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला

तब्बल दोन वर्षांच्या कोरोना काळानंतर पहिल्यांदाच मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात होलिका दहन कार्यक्रम पार पडला. यावेळी नागरिकांनी श्री भैरवनाथाच्या होळीसाठी गौरया आणि पुरणपोळीचा नेवैद्य आणून दिला. यावर्षी होळी पूजन व दहन विशाल गुलाबराव गव्हाणे व प्रकाश रघुनाथ गव्हाणे यांच्या हस्ते पूर्ण विधिवत पार पाडले. तत्पूर्वी भैरवनाथ मंदिराच्या परिसरात आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.

या होळी कार्यक्रमाचे नियोजन उत्तम गव्हाणे, तानाजी गव्हाणे, रोहित सुपेकर, किशोर शिंदे, निखील सुपेकर, सचिन घावटे, अनिकेत कांबळे, ऋषी घावटे, श्रीकांत फडतरे, प्रज्वल शिंदे, अंकुश घटमाळ, ज्ञानेश्वर घावटे, विनोद दौंडकर, साहिल घावटे, स्वप्निल गव्हाणे, गणपत घटमाळ, मंगेश शिंदे आदींनी केले.

No comments:

Post a Comment