"संत शिरोमणी मन्मथस्वामी जन्मोत्सव, वीरशैव लिंगायत समाजाचा उपक्रम
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) समस्त वीरशैव लिंगायत समाजाच्या वतिने श्री संत शिरोमणी मन्मथ स्वामी जन्मोत्सवानिमित्त आज सोमवार दि.12 फेब्रुवारी पासून श्री गुरूलिंग स्वामी मठ संस्थान बेलवाडी येथे तीन दिवसीय परमरहस्य पारायण प्रवचनास भक्तीपूर्ण वातावरणात सुरूवात झाली आहे. गुरू ष.ब्र.108 वेदांताचार्य सिद्धलिंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होणार आहे.
बुधवार दिनांक 14 फेब्रुवारी रोजी गुरू ष.ब्र.108 वेदांताचार्य सिद्धलिंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डेकर यांचे आशिर्वचन होणार आहे. दिनांक 12, 13 व 14 फेब्रुवारी रोजी श्री परम रहस्य पारायण होणार असून 14 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वा. श्री गुरूवर्यांची पाद्यपुजा, आशिर्वचन. आरती , श्रीगुरू ष.ब्र.108 साखरखेर्डेकर शिवाचार्य महाराज यांचे आशिर्वचन होईल. दुपारी 1 वाजता महाप्रसाद, दुपारी 12.21 वा. श्री संत शिरोमणी मन्मथ स्वामींचा जन्मोत्सव साजरा होणार आहे.
या तीन दिवसीय श्री परम रहस्य पारायण सोहळ्याचा भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन वीरशैव लिंगायत समाज परळीच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment